जगातील एकमेव गणपती २१ दिवसात ३ रूपात दिसणारा श्री खवळे महागणपती तारामुंबरी - भाग १
देवाचा गड देवगड देवाचा गड देवगड
1.96K subscribers
21,926 views
485

 Published On Sep 7, 2024

आज आपण पाहणार आहोत, देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील श्री खवळे महागणपती बनवायला अंदाजे २० ते २५ दिवस लागतात. त्याचा संपुर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे.



देवगड एस.टी. स्थानकापासून दक्षिणेला २ किमी. अंतरावर तारामुंबरी हे सागर किना-यावरील गांव, डोंगराच्या उतरणीला, नारळाच्या आणि हापूस आंब्याच्या गर्द राईत कोकणातील खेडेगावाची सुंदरता घेऊन नटलेले गांव. या गावात कै. नाना खवळे यांचे घर आहे. तेच खवळे गणपतीचे देवघर होय. याच घरी अनेक वैशिष्टयांने नटलेला गणपती दरवर्षी येतो. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता अतिशय उत्तम आहे आणि कोकणी सौंदर्याची उकल करून देणारा आहे. देवगडहून श्री ब्राह्मणदेव मंदिर, मिठमुंबरी खाडी, मिठमुंबरी किनारा आणि कुणकेश्वर या पर्यटन स्थळाकडे जाताना वाटेतच खवळे महागणपती देवालय आहे. जामसंडे येथील श्री दिर्बादेवीचे हे माहेरघर समजले जाते.
कोकणात असे काही गणपती आहेत, की ते भक्तांच्या हृदयात स्थान मिळवून आहेत. तेथे अद्भुतता आहे. त्यातलाच ३२१ वर्षांची परंपरा असलेला खवळे महागणपती म्हणजे एक अद्भुत गूढताच आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तारामुंबरी गावात या गणेशाचा महोत्सव ३२१ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. या गणेशोत्सवामागे एक आख्यायिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील गुराब जातीच्या जहाजांचा प्रमुख तांडेल असलेल्या शिव तांडेल यांचा वंश वाढत नव्हता. मालवण येथील मालडी गावातील नारायण मंदिरात ते दररोज पूजा करीत. त्यांना संतान नव्हते. या नारायण मंदिरात एक गणपतीची मूर्ती आहे. ती त्याच्या स्वप्नात आली व म्हणाली, ‘‘माझा मोठा उत्सव कर, पुत्ररत्न होईल.’’ स्वप्नाप्रमाणे शिव तांडेलने छत्रपतींच्या दरबाराला शोभेल असा १७०१ मध्ये उत्सव सुरू केला. आणि काय देवाचा महिमा कार्य वर्णावा? त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव गणोजी असे ठेवण्यात आले. १७५६ साली गणोजी विजयदुर्ग किल्ल्यावर इंग्रजांशी लढताना पकडले गेले. त्यांना शिक्षा झाली.
आजही या गणोजी सरदाराची समाधी तारामुंबरी येथील खवळे घराण्याच्या शेतात आहे. याच गणोजीची नववी, दहावी, अकरावी पिढी हा उत्सव साजरा करतेय. शेतातील जवळजवळ दीड टन साधी माती आणून ती मळून गोळे केले जातात. ती माती सुध्दा ठराविक स्थानिक ठिकाणातूनच (पळशी-भटवाडी) आणली जाते.
ही माती गणपतीसारखी फार दिखाऊ किंवा रंगरंगोटी केलेली नसते. ढोबळमानानं तिचं आगळं रूपडं काहीसं उग्र भासत असल तरी मूतीर्च्या एकटक दर्शनाने जणू ती आपल्याशी बोलतेच आहे असा भास होतो. प्रतिवर्षी मूर्तीमध्ये किंचितही बदल केला जात नाही. या गणपतीची मूर्ती दरवर्षी एकाच रंगाची, आकाराची आणि उंचीची असते.


श्रावण नारळी पौर्णिमेपासून मूर्ती बनविण्यास सुरुवात होते. ही मूर्ती याच घरातील पुरुषांना बनवावी असा दंडक आहे. खवळे बंधू ही मूर्ती बनवितात. त्यात साच्याचा वापर होत नाही. ही मूर्ती बैठी, पावणेसहा फूट उंचीची असते. गणेशचतुर्थीला या महागणपतीला संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून पूजेला बसवितात. फक्त डोळे रंगवून विधिवत पूजा होते. यावेळी उंदीर नसतो. दुसर्‍या दिवशी उंदीर पूजेला लावतात. दुसर्‍या दिवशी महागणपतीचे रंगकाम सुरू होते. पाचव्या दिवशी तो रंगवून पूर्ण होतो. संपूर्ण अंगाला लाल रंग, अंगरखा चांदीच्या रंगावा, पिवळे पीतांबर, दीड फुटी सोनेरी मुकुट, त्यावर पाच फणी नाग, मागे गोल कापडी पंखा, हातावर शेला अशी ही आकर्षक मूर्ती असते. पाचव्या दिवसापासून आरती सुरू होते. घरातील सुवासिनी गणपतीची दृष्ट काढतात.रंगकाम नित्य नेमाने चालूच असते. शेवटचे रंगकाम विसर्जनादिवशी दुपारी होते. यावेळी संपूर्ण चेहर्‍यावर पिवळ्या रंगाचे ठिपके दिले जातात. २१ दिवसांत वेगवेगळ्या तीन रूपात दिसणारा हा जगातील एकमेव महागणपती आहे.
विसर्जनाच्या दिवशी दुपारी खवळे घराण्यातील मागील सर्व पिढीतील मृत व्यक्तींना पिंडदान केले जाते. गणपतीच्या बाजूला पिंडदान होणारा हा जगातील पहिलाच गणपती ! असा हा आगळा-वेगळा खवळे महागणपती !!..

#devgad #ganpati #artwork #ganpatiart #ganpatishala #artist #ganpatibappa #ganpatibappamorya #artoftheday

Music - DEVA SHREE GANESHA

Content owners: LatinAutorPerf, SOLAR Music Rights Management, UNIAO BRASILEIRA DE EDITORAS DE MUSICA - UBEM, LatinAutor - SonyATV, Sony Music Publishing, Muserk Rights Management
Content type: Melody or lyrics


देवाचा गड देवगड - Registered ®️

आपल्या चॅनेल बद्दल
हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील.
तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या.


YouTube -    / @devacha.gad.devgad  

Instagram -   / devacha_gad_devgad_official  


© All of the content in this video is made by the creator devacha.gad.devgad Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos
should be used without prior permission.

Copyright disclaimer

under Section107 of the Copyright Act: This disclaimer appears on content commonly YouTube videos - that uses someone else's copyrighted content. Including this statement of"fair use" helps protect you against copyright infringement claims.

show more

Share/Embed