Haryana मधल्या निकालावरुन Sanjay Raut यांची काँग्रेसवर टीका,Thackeray vs Congress संघर्षाला सुरुवात?
BolBhidu BolBhidu
2.18M subscribers
13,158 views
490

 Published On Oct 9, 2024

#BolBhidu #UddhavThackeray #SanjayRautonCongress

मंगळवारी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचे निकाल लागले आणि हरियाणात भाजप सत्तेची हॅट्ट्रीक करणार हे स्पष्ट झालं. लोकसभेत बसलेल्या सेटबॅकनंतर हरियाणातला विजय भाजपला रिव्हाईवल देणारा आहे. त्यामुळं भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीका केली जातेय. आता कट्टर विरोधक म्हणून भाजपनं काँग्रेसला टार्गेट करणं स्वाभाविक आहे. पण या निकालानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस सोबत असलेल्या ठाकरे गटानंही ही संधी सोडलेली नाही. सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर थेट निशाणा साधण्यात आलाय. जिंकलेल्या डावाचं पराभवात रूपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकावं, अशा शब्दांत सामनातून काँग्रेसवर टीका करण्यात आलीय. तर काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी तशी भूमिका घ्यावी, मग बाकीचे पक्ष आपली भूमिका घेतील, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिलाय.

त्यामुळं हरियाणात काँग्रेसच्या पराभवावरुन ठाकरे गटानं काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याचं दिसून येतंय. आता जागावाटपातली बार्गेनिंग पॉवर वाढवणं, मुख्यमंत्रीपदावरच्या दाव्यासाठी दबाव वाढवणं अशी उथळं कारणं काँग्रेसवरच्या टीकेसाठी देण्यात येत असली तरी ठाकरे गटाला यातून खोल विषय साध्य करायचाय, अशा चर्चा होतायंत. हरियाणाच्या निकालावरुन काँग्रेसला टार्गेट करुन ठाकरे गटाला नक्की काय साध्य करायचंय, ठाकरेंना या टीकेतून नक्की काय मेसेज द्यायचाय, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed