Haryana मध्ये Congress च्या पराभवामुळं Uddhav Thackeray मुख्यमंत्री पदासाठी कसे डाव टाकतायंत ?
BolBhidu BolBhidu
2.18M subscribers
37,139 views
976

 Published On Oct 8, 2024

#BolBhidu #HaryanaElectionResult #UddhavThackeray

हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या विधानसभेचा निकाल आज जाहीर झाला. जम्मूमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेसने यश मिळवलं असलं तरी हरियाणात काँग्रेसला धूळ चारत भाजपने न भूतो भविष्यती अस यश मिळवलं. एक्झिट पोल्सपासून ते भाजपचे नेते, कॉंग्रेसचे नेते सगळ्यांचेच अंदाज चुकले. पण हरियाणाच्या भाजपची विजयातून सगळ्यात मोठा धक्का बसला आहे तो कॉंग्रेसला. लोकसभेला जरी एकट्या भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात कॉंग्रेसला यश आलं असलं तरी लोकसभेनंतर सगळ्या देशाच लक्ष लागून राहिलेल्या हरियाणा विधानसभा निवडणूकीत भाजपने सत्ता पुन्हा आणून कॉंग्रेसला रिऍलिटी चेक दिला आहे. विशेषकरून महाराष्ट्रातल्या.

महाराष्ट्रात येत्या २-३ दिवसांत आचारसंहिता लागून निवडणूक लागेल, या निवडणूकीसाठी लोकसभेनंतरचं डॅमेज भरून काढून योजना लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुती जोरदार प्रचार करतीये, दुसरीकडे मविआ विशेषकरून काँग्रेस महाराष्ट्रात आपणचं सत्तेत येणार आणि मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच होणार या अविर्भावात ओव्हरकॉन्फिडंट झालेत. जे हरयाणात होत होत तेच महाराष्ट्रात होतयं. इकडे ठाकरेंनी हरयाणाचा निकाल आल्या आल्या कॉंग्रेस राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा मी समर्थन देतो अस पुन्हा म्हणून टोलेबाजी केलीये. त्याचवेळी ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदींनी भाजपसोबतच्या थेट लढाईत कॉंग्रेस कमजोर पडते अस विधान केलं आहे. थोडक्यात हरियाणात भाजप जरी जिंकली असली तरी महाराष्ट्रात आता ठाकरेंचा जोर वाढणार आणि कॉंग्रेसचा भाव कमी होणार याची चर्चा सुरू झालीये, नेमकी का पाहूया व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed