Ahmadnagar Politics:नगर जिल्ह्यात 'या' तीन राजकुमारांचं होणार लाँन्चिंग; कोण जिंकतंय, कोण हरतंय पहा?
Ahmednagarlive24 Ahmednagarlive24
35.6K subscribers
3,762 views
37

 Published On Premiered 15 hours ago

नगर जिल्हा हा साखर कारखान्यांचा जिल्हा. येथे तब्बल 20-22 साखर कारखाने आहेत. जवळपास चौदाही तालुक्यात साखर कारखाने असल्याने, जिल्ह्यावर पूर्वापार साखरसम्राटांचाच होल्ड राहिलाय. येथील स्थानिक राजकारणाला संसदेत जायचं म्हटलं तरी सहकारातूनच जावं लागतं. नगरच्या मातीत सहकार उगवलाही आणि फुललाही. सध्या देशात व राज्यात बोलबाला असलेल्या सहकाराची मुहूर्तमेढ, याच जिल्ह्याने रोवून दिली. येथील राजकारण्यांना आपल्या पुढच्या पिढ्यांना खुर्चीवर बसवायला जास्त कसरत करावी लागत नाही, असा इतिहास आहे. विखे, थोरात, गडाख, काळे, कोल्हे, तनपुरे, घुले, राजळे, पिचड या दिग्गजांची दुसरी-तिसरी पिढी सध्या सक्रीय आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील तीन राजकुमारांचं लाँन्चिंग होण्याच्या चर्चा आहेत. राजकारण व समाजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं असल्यानं, या तिन्ही राजकुमारांकडे सध्या जिल्ह्याच लक्ष लागलंय. कोण आहेत हे राजकुमार..? का होतेय त्यांच्या लाँन्चिंगची चर्चा..? कसं आहे त्यांच्या तालुक्यातलं वारं..? या तिघांपैकी कोणता राजकुमार आमदार होईल..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न...#Ahmednagarnews #Ahmednagarpolitics #Ahmednagarlive24 #Ahmednagarelection #Ahmednagarnews

show more

Share/Embed