ADCC Bank Politics : कर्डिले-विखेंची गोची; जिल्हा बँकेवरचे आरोप विधानसभाही गाजवणार
Ahmednagarlive24 Ahmednagarlive24
35.6K subscribers
44,333 views
348

 Published On Premiered Sep 26, 2024

गेल्यावर्षी जिल्हा बँकेत सत्ताबदल झाला. मार्चमध्ये थोरात आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली बँक, महसूलमंत्री विखेंनी ताब्यात घेतली. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बँकेचं अध्यक्षपद भाजपच्या ताब्यात आलं. विशेष म्हणजे, थोरात गट व राष्ट्रवादीचे बहुमत असतानाही हे सत्तांतर घडलं. राष्ट्रवादीची चार, तर काँग्रेसचं एक मत फुटल्यानं शिवाजी कर्डिले अध्यक्ष झाले. या सत्तांतराची राज्यभर चर्चा झाली. विखेंचं राज्यपातळीवर वजनही वाढलं. पण आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही बँक पुन्हा चर्चेत आलीय. मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवारांनी या बँकेच्या कारभारावर चिंता व्यक्त केली, अन् त्याचे पडसाद थेट नगर जिल्ह्यात पडले. काँग्रेस व शरद पवार गटाने बँकेच्या कारभारावर आता आरोप सुरु केले आहेत. संगणक खरेदी घोटाळा, वाटलेली कर्ज अशा साऱ्याच गदारोळानंतर आता बँकेच्या नोकरभरतीवरही आरोप होऊ लागला आहे. बँकेबाबतचं हेच निगेटीव्ह थाँट्स, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप व सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काय आहेत आरोप आणि काय आहे बँकेची स्थिती याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट... #Ahmednagarnews #Ahmednagarelection #Ahmednagarlive24 #Ahmednagarpolitics #Ahmednagar

show more

Share/Embed