न्हावीगड | Nahvi Gad | Mangi tungi | मागी तुंगी | Marathi Vlogger | Safar Maharashtrachi
Safar Maharastrachi Safar Maharastrachi
2.16K subscribers
970 views
158

 Published On Sep 29, 2020

गडाचा परिचय :
न्हावीगडावर जाण्यासाठी ताहराबादमार्गे मांगी-तुंगी गाव गाठावे लागते मांगी-तुंगी गावातून तासाभराच्या चालीने वडाखेल गाव लागते. वडाखेलपर्यंत कच्चा रस्ता आहे त्यामुळे पायीच त्रेधातिरपीट करावी लागते. वडाखेलमधून पाताळवाडीकडे कूच केल्यास त्या पायथ्याच्या गावी पोचता येते. वडाखेल ते पाताळवाडी हे अंतर अर्ध्या तासाचे आहे. पाताळवाडीतून सरळ वाट किल्ल्याच्या पठारावर गेलेली आहे. पठारावरून दोन वाटा फुटतात. एक वाट समोरून वर चढते, ती थोडी कठीण आहे. वाटेत सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. दुसरी वाट पठारावरून डावीकडे वळसा घालून पाय-यांपाशी जाते. त्या वाटेला पाण्याची दोन-तीन टाकी लागतात. गडावर जाणाऱ्या पायऱ्या मात्र जपून चढाव्या लागतात. पाताळवाडीपासून गडावर दीड तासात पोचता येते
या गडावर जाताना पायऱ्या तर लागतात; पण दरवाज्याचा मागमूसही नाही. न्हावीगड किल्ल्याचा माथा हा निमुळता आहे. गडावर जाण्याच्या वाटेवर पाण्याचे तीन टाके आणि मंदिर लागते. घरांचे काही अवशेषही सापडतात. गडाचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळका आहे. तो चढून जाण्यासाठी प्रस्तरारोहण आवश्‍यक आहे. त्या सुळक्‍यात एक नेढे आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो.
गडमाथ्यावर पोचल्यावर समोर दोन वाटा फुटतात. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर वाडा लागतो. वाड्याशिवाय येथे बघण्यासारखे काही नाही. परत फिरून डावीकडच्या वाटेवरून थोडे पुढे गेल्यास कातळात खोदलेली गुहा लागते. गुहेत उतरण्यासाठी शिडी लावलेली आहे.
गुहेच्या वरच्या भागावर घुमटाकार कमान असलेली विहीर आहे. तेथून थोडे पुढे गेल्यास आणखी एक गुहा लागते. त्या गुहेसमोरून पुढे जाणारी वाट तलावापाशी थांबते. तलावाच्या काठावर गुहेत महादेवाचे मंदिर आहे. तलावाच्या कडेकडेने जाणाऱ्या वाटेने डोंगरमाथ्यावर पोचता येते. वाटेत भुयारी टाके आढळतात. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर तलाव आहे. या गडावरून मांगी-तुंगी, मुल्हेर, मोरागड, साल्हेर आणि हरगड हा परिसर दिसतो गडमाथा फिरण्यास दोन तास पुरतात.

show more

Share/Embed