Vidhansabha Election 2024 : हे नेते असतील Congress चे संभाव्य ५० उमेदवार | Vishaych Bhari
Vishaych Bhari Vishaych Bhari
795K subscribers
94,976 views
775

 Published On Oct 14, 2024

Vidhansabha Election 2024 : हे नेते असतील Congress चे संभाव्य ५० उमेदवार | Vishaych Bhari

एकेकाळी काँग्रेसचा भक्कम बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात २०१४ नंतर पक्षाची जबरदस्त पिछेहाट झाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ २ जागा जिंकता आल्या होत्या. तर २०१९ मध्ये पक्षाची कामगिरी आणखीनच खालावून केवळ एका जागेवर काँग्रेसचा विजय झाला होता. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची अवस्था काहीशी अशीच होती. पक्षाला २०१४ मध्ये ४२ जागा मिळाल्या होत्या. तर २०१९ मध्ये हा आकडा ४४ एवढाच राहिला होता. त्यामुळे सर्वाधिक काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या काँग्रेसला राज्याच्या राजकारणात फारसं महत्त्व राहिलं नव्हतं.  यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात काँग्रेसला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामधील काँग्रेसचं नशीब एकदम बदलून गेलं. १७ जागांवर लढून १३ जागांवर विजय मिळवत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. सोबत सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील हेही मुळचे काँग्रेसचे असल्याने आणि त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने पक्षाच्या खासदारांची संख्या १४ एवढी झाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये फारसे महत्त्व दिले न गेलेला काँग्रेस पक्ष विधानसभेच्या जागावाटपामध्ये मुख्य पक्ष बनला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये सर्वाधिक जागा ह्या काँग्रेसला मिळणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. सध्या समोर येत असलेल्या समिकरणांनुसार काँग्रेसला राज्यात १०० ते ११० च्या दरम्यान जागा मिळू शकतात. या जागांवर उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेसकडून सध्या जोरदार तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे पहिले ५० उमेदवार कोण असू शकतात. याचा घेतलेला हा आढावा.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vidhansabhaelection2024
#vidhansbha
#congress
#sharadpawar
#sharadpawarlive
#vishaychbhari
#विषयचभारी

tv9 marathi latest news,marathi news live today,marathi news live,tv9 marathi news channel,maharashtra rain news,abp maza breaking news,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya,tv9 marathi live,marathi batmya video,tv9 marathi batmya live today,crime news,marathi news,tv9 marathi video live,marathi latest news,tv9 marathi news,marathi news latest,marathi news today,marathi breaking news,tv9 marathi live news,marathi news updates

show more

Share/Embed