Yeola Vidhan Sabha: Maratha vs OBC वादाचा Chhagan Bhujbal यांना येवल्यात फायदा होणार की तोटा ?
BolBhidu BolBhidu
2.2M subscribers
14,070 views
345

 Published On Oct 14, 2024

#BolBhidu #ChhaganBhujbal #YeolaVidhanSabha

मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी आता समाजकार्य पुढं न्यावं. राजकीय जीवनात निर्णय घेताना त्यांनी मला विचारण्याची काही गरज नाही. आता मला काही काळ आराम करू द्या, असं त्यांनी म्हटल्यानं भुजबळ राजकीय संन्यास घेतात की काय अशी चर्चा रंगली. मात्र येवल्यातून मीच निवडणूक लढवणार असं ठासून सांगत भुजबळांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचं स्पष्ट केलंय. पण यंदा मात्र भुजबळांसाठी निवडणूक म्हणावी तशी सोपी नसल्याचं सांगितलं जातं. त्यांच्यापुढं शरद पवारांची नाराजी, आणि मराठा फॅक्टरचं मोठं आव्हान आहे. मंत्री असूनही भुजबळांनी उघडपणे मराठा समाजाविरोधात भूमिका घेतली. त्यातून आता भुजबळांना रोखायचं असल्याचा निर्णय येवल्यातील मराठा समाजाने घेतल्याची चर्चा आहे.

मराठा आंदोलक जरांगे पाटील रविवारी येवल्यातील मुक्तीभूमीवर अभिवादन करण्यासाठी गेले होते.तेव्हा जरांगे आणि भुजबळांच्या समर्थकांत यावेळी जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं. त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जरांगेंचे पोस्टर फाडल्यानं येवल्यातील वातावरण तणावपूर्ण झालं. या राड्यामुळं मतांचं ध्रुवीकरण होणार असल्याचे बोललं जातंय. गेल्या वर्षभरापासून जरांगेंशी घेतलेला पंगा भुजबळांना निवडणुकीत भारी पडणार का, की भुजबळ त्यावर स्वार होऊन पुन्हा एकदा आमदार होणार हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed