Sayaji Shinde Joins Ajit Pawar:सयाजी शिंदे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत का गेले ? दोघांना काय मिळालं
BolBhidu BolBhidu
2.2M subscribers
31,339 views
500

 Published On Oct 12, 2024

#BolBhidu #SayajiShinde #AjitPawar

काल सकाळी शिंदे आणि दादांमध्ये टशन झाल्याच्या बातम्या आल्या. मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी झाली आणि अजित पवारांनी बैठक सोडली अशा बातम्या सुरू झाल्या होत्या. या बातम्या चालू होत्याच त्याच काळात अजित पवार संध्याकाळी तातडीची बैठक घेतील अस सांगण्यात आलं. साहजिक चर्चा चालू झाली ती अजित पवारांच्या एक्झिट प्लॅनची. अजित पवार महायुती सोडतील, अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत जातील, अजित पवार मविआ किंवा महायुतीचा भाग न होता स्वतंत्र लढतील अशा अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्याचं कारण शिंदे आणि दादांमध्ये तणातणी झाल्याचं सांगितलं जात होतं. पण संध्याकाळच्या पत्रकारपरिषदेत अजित पवारांनी दूसरेचं शिंदे लोकांच्या समोर आणले, आणि या नाट्यावर पडदा पडला.

सह्याद्री देवराई या सामाजिक चळवळीमुळे तसेच आपल्या अभियनामुळे प्रसिद्ध असणाऱ्या सयाजी शिंदेचा पक्षप्रवेश या पत्रकारपरिषदेमार्फत पार पडला. सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशासाठी प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ, अजित पवार अशा राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची उपस्थिती होती. एकतर आजवर राजकारणात कशीच नसणारे सयाजी शिंदे अचानक राजकारणात येतात? त्यातही ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतात? ते देखील पक्षाचे सर्व प्रमुख व मोठ्ठे नेते या कार्यक्रमाला उपस्थित असतात म्हणल्यानंतर एक प्रश्न विचारला जातोय सयाजी शिंदेना घेवून अजित पवार काय करणार? सयाजी शिंदे आगामी विधानसभा लढवणार आहेत का? आणि लढवणार तर कुठून? की राज्यपालनियुक्त आमदारकीचं आश्वासन मिळाल्यामुळे सयाजी शिंदेंनी हा निर्णय घेतलाय. सयाजी शिंदेंना पक्षात घेवून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नेमकं काय मिळवलय. समजून घेवूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed