खिद्रापूर येथील 6 व्या शतकातील ऐतिहासिक पुरातन कोपेश्वर मंदिर khidrapur shivmandir
shirala santosh j shirala santosh j
317 subscribers
322 views
0

 Published On Oct 1, 2024

खिद्रापूर हे शिरोळ तालुका कोल्हापूर कृष्णा नदी काठावर वसलेले गाव असून तेथे कोपेश्वर मंदिर आहे येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूनी केले. नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे.औरंगजेबाचा मिरज येथे सैन्य तळ असताना त्याच्या अज्ञेने या मंदिरातील शिल्पांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली. तरीही आज अस्तित्वात असलेल्या शिल्पांचे सौंदर्य डोळ्यात भरण्यासारखे आहे.देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे. याला स्वर्ग मंडप म्हणतात. स्वर्ग मंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो गोलाकार उघडून आकाशाला भिडलेला असतो. याला हाताने कोरलेल्या ४८ खांबांचा आधार आहे. आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती येते, हे स्वर्ग मंडप नावाचे औचित्य सिद्ध करते. स्वर्ग मंडपाच्या परिघात आपल्याला गणपती, कार्तिकेय स्वामी, भगवान कुबेर, भगवान यमराज, भगवान इंद्र इत्यादीं मूर्ति आहेत दगडी पीठावर देवनागरी लिपीत संस्कृतमध्ये कोरलेला शिलालेख आहे मंदिरामध्ये अप्सरा देवतांच्या मूर्ती दिसून येतात अतिशय अवघड ठिकाणी व कोपऱ्यामधून शिल्पे कोरली आहेतऔरंगजेबाने हे मंदिर तोडण्यासाठी सैनिकांना पाठवले होते परंतु आजही मंदिर अस्तित्वात आहे मात्र बऱ्याचशा मुर्त्या त्यामध्ये चेहरे तोडलेले दिसतात भारत सरकारने हे संरक्षित मंदिर म्हणून घोषित केले आहे नरसोबावाडी च्या शेजारीच हे मंदिर आहे #all #motivation #hindutva #history #bjp #hinduphilosopher #marathi #modi #khidrapur #kolhapur #maharashtra #sanatandharma

show more

Share/Embed