छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथे गद्दार लोकांना कैद करून ठेवले जायचे | कारागृह किल्ले लिंगाणा |
Psycho Prashil Psycho Prashil
457K subscribers
484,853 views
10K

 Published On Aug 27, 2022

टीम सह्याद्री रॉक एडवेंचर सोबत असेच साहसी व थरारक ट्रेक करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधा👇🏻👇🏻👇🏻
पवन घुगे:- 8691075767
दर्शन देशमुख :- 8888251143
रणजित भोसले :- 8879003069

Instagram I'd :- Sahyadri_rock_adventures
https://instagram.com/sahyadri_rock_a...

Official Website. https://sahyadrirockadventures.in

------------------------------------------------------------------------------------------------------------

सह्याद्रीमध्ये भटकत असताना वाट चुकून होणारे अपघात टाळण्यासाठी नेटवर्क नसतानाही GPS च्या माध्यमातून वाट दाखवण्यासाठी "Durg :Offline navigation"

खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता.

https://play.google.com/store/apps/de...

लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे.माणगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे.
रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत.

या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत. वर अतिअवघड असा वाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा, त्यामुळे येथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होऊन कैदी अगदी खचून जात असत. पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे. जर कोणी कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमवावाच लागे. गडावरचे दोर आणि शिडा काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद

लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत.
मोहरी नावाच्या सह्याद्रिमाथ्यावरील गावातून बोराट्याची नाळ (दोन डोंगरांमधील अरुंद वाट) जवळ आहे. ही नाळ चालत जायला बरीच अवघड आहे. येथून जवळच असणाऱ्या रायलिंगहून लिंगाण्याचे दर्शन होते. सिंगापूर या नाळेने जाणे त्या मानाने सोपे आहे. लिंगाण्यावर जाण्यासाठी आधी लिंगणमाचीला जाऊन जननीचे आणि सोमजाईचे दर्शन घेऊन मग लिंगाण्याकडे निघतात. उजवीकडे पाण्याचे एक टाके आहे. पुढील वाट कड्याच्या अगदी टोकावरून जाते. येथे खालून येणारी पायऱ्या ढासळलेली एक वाट आहे. उजव्या बाजूस १५-२० फुटांचा कडा आहे, तिथे एक उंबराचे झाड कडा फोडून बाहेर आले आहे. त्याचाच आधार घेऊन कडा पार करावा लागतो. येथून वर गेल्यावर मग लिंगाण्याच्या त्या उंचावत गेलेल्या शिखराचा तळ आहे. त्याच्या पोटात एक गुहा आहे, तिला सदर म्हणतात. सदरेला एक प्रवेशद्वार आणि चार खिडक्या आहेत. त्या गुहेल

गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे सामावून घेते. समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्र्वर आपल्याला दर्शन होते. या गुहेवरून पुढे गेल्यावर एक कोरडा हौद व त्यानंतर पुढे चांगल्या पाण्याच्या हौद. इथे एक शिवलिंग आहे, पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही. या हौदाच्या पुढे, म्हणजे गडाच्या उत्तरेस पायऱ्या आहेत त्याने वर असलेल्या गुहांपर्यंत जाता येते.

लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायची वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येते. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३-४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे. मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे,
----------------------------------------------------------------------------------------------------------------
►YouTube - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Psycho Prashil
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
Music from #InAudio: https://inaudio.org/
Track Name.inaudio - Infraction - Alioth


#raigad #linganafort #fortnite #maharashtra #india #climbing #pinnacle #adventure #most #beautiful #unbelievable #Pawankhind #PanhalaToPawankhind #ChatrapatiShivajiMaharaj #VishalgadFort @Maharashtra Tourism @GoPro @gopro @goproindia
#CARAVAN #CAMPERVAN #MOTOHOMEcaravan #DevkundWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #KalakraiPinnacle #kalakraiSulka #कळकराई_सुळका #Prashil #PsychoPrashil #PrashilKalakraiSulka #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall
#BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
#PadseWaterfall #ZenithWaterfall
---------------------------------------------------------------------------------------------------

show more

Share/Embed