जिभेवर चव रेंगाळत राहील असे अप्रतिम चवीचे डिंकाचे लाडू, Dink Ladoo, Edible Gum Laddu,Recipes by Jayu
Recipes by Jayu Recipes by Jayu
45.2K subscribers
263,193 views
2.8K

 Published On Dec 19, 2021

लाडू पटापट वळूनही जर मिश्रण थंड झालं, तर मिश्रणात थोडसं तूप घालून मिश्रण किंचित गरम करून घेणे

साहित्य

२५० ग्रॅम डिंक
२५० ग्रॅम खारीक / खारीक पावडर
२५० ग्रॅम सुकं खोबरं
१०० ग्रॅम बदाम
१०० ग्रॅम काजू
१०० ग्रॅम पिस्ते
१०० ग्रॅम खसखस
७०० ग्रॅम गूळ
४००-४५० ग्रॅम साजूक तूप
३ टीस्पून सुंठ
१ जायफळ
१/२ ग्रॅम केशर

Ingredients

250 grams edible gum
250 grams dry dates / dry dates powder
250 grams dry coconut
100 grams almonds
100 grams cashew nuts
100 grams pistachios
100 grams poppy seeds
700 grams jaggery
400-450 grams pure ghee
3 tsp dried ginger powder
1 nutmeg
1/2 grams saffron

कृती

१. सर्वप्रथम काजू, बदाम आणि पिस्ते मंद गॅस वर वेगवेगळे भाजून घ्यावे. साधारण २-३ मिनिटं लागतात
२. त्यानंतर मंद गॅस वर खसखस भाजून घ्यावी. साधारण ४-५ मिनिटं लागतात
३. त्यांनतर मंद गॅसवर सुकं खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यावे. साधारण १२-१३ मिनिटं लागतात.
४. आता २ चमचे साजूक तुपावर, मंद गॅसवर खारीक पावडर भाजून घ्यावी. साधारण २-३ मिनिटं लागतात
५. लागेल तेवढं तूप घेऊन, मंद गॅसवर थोडा थोडा डिंक तळून घ्यावा.
६. आता काजू ,बदाम , पिस्ता यांची भरडपुड अथवा आवडीप्रमाणे पूड करून घ्यावी.
७. खसखस थोडीशी मिक्सर वर फिरवून घ्यावी
८. भाजलेलं खोबरं हाताने चुरून घ्यावं.
९. तळलेला डिंक, भाजलेलं खोबरं, भाजलेली खारीक पूड, काजू बदाम पिस्ता यांची पूड हे सगळं एकत्र करून घ्यावं.,
१०. त्यात एक जायफळ किसून घालावे.
११. केशर खलून पूड करून घ्यावी.
१२. पाक करण्यासाठी गूळ चिरून घ्यावा
१३. गुळामध्ये १ वाटी पाणी घालून गुळाचा पाक करायला ठेवावा.
१४. गूळ पूर्णपणे विरघळल्यावर आणि पाकाला एक उकळी आल्यावर केशर पूड घालून गॅस बंद करावा.
१५. आता, पाकामध्ये सगळे मिश्रण घालून एकत्र करणे
१६. शक्यतो , मिश्रण गरम असताना लाडू वळावे.

show more

Share/Embed