Sursangat 2024 Part2
mmpittsburgh mmpittsburgh
41 subscribers
30 views
0

 Published On Oct 7, 2024

शास्त्रीय संगीत कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!मंडळी नमस्कार, कालच्या शास्त्रीय संगीत कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार. तुमच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अधिकच खास झाला . कलेप्रती आदर आणि एकतेचे वातावरण तयार झाले.१०० पेक्षा जास्त रसिकांनी एकत्र येऊन अप्रतिम सादरीकरणांचा आनंद घेतला, आणि आपण सर्व संगीताच्या त्या अद्भुत दुनियेत रमून गेलो. तुमच्या उत्साहाने आणि प्रेमाने संपूर्ण संध्याकाळ आनंदमय झाली. पंडित श्री. राम देशपांडे यांची खायला गाण्यावरील हुकूमत , श्री. संजय देशपांडे यांचा अद्भुत तबला आणि श्री. अभिषेख शिनकर यांची हार्मोनियम  वरील जादूची बोटे या सर्व वातावरणाने संगीताचे सात स्वर्ग उभे राहिले. आम्हाला आशा आहे की हा कार्यक्रम तुम्हाला देखील आनंददायक वाटला असेल.  तुमच्या प्रचंड पाठिंब्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, आणि आम्ही पुढील कार्यक्रमांमध्येही तुम्हाला पाहण्यास उत्सुक आहोत!

show more

Share/Embed