यशस्वी तमासगीर कलावंताचा जीवन प्रवास आणि संदेश
Lokranjan Lokranjan
47.8K subscribers
66,498 views
419

 Published On Jul 28, 2020

महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेत १९७४ साली विनोदसम्राट गुलाब बोरगावकर सह लेखणीसम्राट गणपत व्ही.माने चिंचणीकर लोकनाट्य तमाशा मंडळ उदयास आले. यावेळी प्रसिद्ध तमाशा म्हणून हा तमाशा फड नावारूपाला आला. या काळात सांगली जिल्ह्यात हा सर्वात मोठा तमाशा म्हणून ओळखला जात होता. याच तमाशा फडात गुलाब बोरगावकर यांचे शिष्य आणि जावई मुरली शिंदे बोरगावकर यांनी प्रवेश केला आणि १९७८ सालापासून आजअखेर तमाशात वावरूनही कोणत्याही प्रकारचे व्यसन केले नाही. आपल्या कुटुंबाला योग्य दिशेने नेताना त्यांची मुले चांगल्या ठिकाणी नोकरी करतात. तमाशा कलावंत असूनही चांगलं जीवन जगण्याचा आणि पोट भरण्याचा व्यवसाय म्हणून तमाशाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा विचार सतत आत्मसात केला. आपले वडील बाबूराव बोरगावकर यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवला. असे हे मुरली शिंदे बोरगावकर आज अत्यंत सुखासमाधानाचे जीवन जगत आहेत. ते सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे रहात असून त्यांची कलाकार पत्नी रंजना शिंदे त्यांना गेल्या चाळीस वर्षापासून अत्यंत चांगल्या प्रकारची साथ देत आहेत. याचे समाधान मुरली शिंदे वारंवार व्यक्त करीत असतात. म्हणून त्यांच्या जीवनाचा प्रवास अनेक कलावंतांनी घ्यावा, व्यसनमुक्त राहावं असेही ते सांगतात. आपण आवर्जून या कलावंताचा हा प्रवास ऐकावा अशी विनंती.

show more

Share/Embed