मांसाहार करावा की नाही - सदगुरुंच्या टिप्स | VEG OR NON-VEG? - SADHGURU MARATHI
Sadhguru Marathi Sadhguru Marathi
334K subscribers
188,192 views
2.7K

 Published On Nov 25, 2019

तुम्ही मांसाहाराचा मोह टाळू शकत नाही अशी एक खायला आवडणारी व्यक्ती आहात का? या अतिशय परखड व्हिडिओमधे, सद्गुरु मांसाहारी अन्न सेवन करणे हे क्रूर आहे की नाही यावर आपले मत व्यक्त करत आहेत.

English Video -    • Is Eating Non-Vegetarian Food Ethical...  

मांसाहारी अन्न सेवन करणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे का? - सद्गुरुंसोबत हरीप्रिया

सद्गुरु: तुम्ही एखादे फळ तोडत असाल किंवा एखाद्या प्राण्याला कापून खात असाल, सर्वकाही क्रूरच आहे. आपण फक्त तसे करताना आवश्यक तेवढी संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे. आपले संगोपन करण्याचा आपल्याला पुर्णपणे हक्क आहे. पण दुसर्‍याचा जीव घेण्याचाआनंद लुटण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही.

हरिप्रिया: तर खाण्याबद्दल एक गोष्ट, मी खूप खादाड आहे...
मी खूप खादाड आहे.

सद्गुरु: खादाड?

हरिप्रिया: हो खादाड. माझे खाण्यावर प्रेम आहे. तर चित्रीकरणाच्या दरम्यान मी ते टाळते पण ब्रेकच्या वेळी मात्र मी अन्नावर तुटून पडते. पण प्राण्यांवर सुद्धा माझे प्रेम आहे.

सद्गुरु: ओह, म्हणून तू त्यांना खाऊन टाकतेस.

हरिप्रिया: नाही, पण मी जेंव्हा एखादी घटना पाहते, जेंव्हा कोणाचा तरी...

सद्गुरु:नाही लोकं म्हणतात मला माझ जेवण आवडत. तर तुझ प्राण्यांवर प्रेम आहे, म्हणून तू त्यांचा समावेश जेवणात करतेस का?

हरिप्रिया: नाही, मी खूप वेळा प्रयत्न करून पहिला, म्हणजे, की मी मांसाहार करणं थांबवलं पाहिजे, मी तो प्रयत्न पण करून पाहिला. आणि मी मांसाहारापासून एक आठवडा, दहा दिवस दूर राहिले होते, पण ज्या क्षणी मी इतर कोणाला मांसाहारी पदार्थ खाताना पाहते, तेंव्हा मी म्हणते, नक्की पुढच्या महिन्यापासून थांबवेन. यातून बाहेर कस पडाव हे मला समजत नाहीये. अगदी माझ्या घरात पण दोन पाळीव प्राणी आहेत आणि या सर्व गोष्टीविषयी काय बोलावं ते मला समजत नाही, सद्गुरु. हा मांसाहार आणि मांसाहार न करणे?

सद्गुरु: तू आता तुझ्या पाळलेल्या प्राण्यांना कधी खाऊन टाकणारेस?

हरिप्रिया: नाही. नाही. ती तरी माझ्या मुलांसारखी आहेत.

सद्गुरु: सगळे असच म्हणतात, मी तर काही लोकांना कोंबड्यांशी प्रेमाने बोलताना पाहिलयं, आणि पुढच्याच आठवड्यात ते त्यांना खाऊन टाकतात.

हरिप्रिया: तुम्ही शाकाहारी आहात का मांसाहारी?

सद्गुरु: मी मानवतावादी आहे

हरिप्रिया: मानवतावादी.

सद्गुरु: हे पहा, आज वनस्पती सुद्धा इतर कोणत्याही प्राण्याइतक्याच संवेदनशील आहेत हे दाखवणारे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही वनस्पती खा, किंवा प्राणी किंवा आणखी काही, ती सुद्धा हिंसाच आहे. एवढंच की ते किंचाळत नाहीत, ते किंचाळतात, पण तुम्हाला त्या किंकाळ्या तुम्हाला ऐकू येत नाहीत. ते किंचाळतात हे सिद्ध करणारे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत.

याचे परीक्षण केले गेले आहे, समजा एखादा प्राणी आला.... झाडांच्या समुहामधे, असे समजुयात की इथे एक हजार किंवा दहा हजार झाडं आहेत. आणि समजा की एक हत्ती आला आणि त्याने झाडांची पानं खायला सुरुवात केली. ताबडतोब हे झाड त्याच्या भोवतीच्या प्रजातीतल्या सगळ्या झाडांना संदेश देईल की त्याला कोणीतरी खाऊन टाकते आहे, ते हत्तीला ओळखू शकेल का नाही हे मला माहिती नाही, पण त्याला असं खाऊन टाकलं जातं आहे, आणि काही मिनिटातच जर हत्ती तिथल्या दुसर्‍या झाडांकडे गेला, तर सर्व झाडांनी त्यांच्या पानात एक विशिष्ट प्रकारचं विष आपल्यात स्त्रवतात. हत्ती जेंव्हा ते खायचा प्रयत्न करतो, तेंव्हा त्याला त्या पानांची चव कडवट लागेल आणि ती विषारी पण असतील, त्यामुळे तो त्यांना स्पर्श करणार नाही. तर त्यांच्यामधे तेवढी संवेदनशीलता असते. म्हणून तुम्ही एखादे भाजी किंवा फळ तोडत असाल किंवा एखादा प्राणी कापून खात असाल, सर्वकाही क्रूर आणि हिंसकच आहे. तस करताना जितकं आपल्याला गरजेचं आहे आणि आवश्यक त्या संवेदनशीलतेनं करायला हवं. तू ही खादाड असल्याची कल्पना सोडून द्यायला हवीस. आपण सर्वांनी अन्न खाल्लच पाहिजे नाहीतर, तो ह्याच्यासाठीच क्रूर ठरेल.

पण अन्नासोबत आपली ओळख बांधणे हे योग्य नाही, कारण तसं केल्याने आपण आपले लाड पुरवतो, फक्त आपले पोषण करत नाही. आपले पोषण करायचा आपल्याला हक्क आहे. एक जीवन म्हणून आपल्याला आपले पोषण करायचा आधिकार आहे कारण या जगात अन्न साखळी अशाच प्रकारची आहे, पण केवळ आपल्या आनंदासाठी इतर कोणाचा जीव घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण तसे अजिबात करू शकत नाही. या जीवनाचे पोषण करण्याचा आपल्याला संपूर्ण अधिकार आहे पण इतरांचा जीव घेऊन त्याचा आनंद लुटण्याचा आपल्याला अधिकार नाही. म्हणून स्वतःला खादाड असे म्हणू नको कारण अन्न हे तुमची ओळख कधीही बनू नये. अस्तित्वासाठी, पोषणासाठी, त्या क्षणी जे खायला लागेल ते आपण खाऊ. धन्यवाद.

#SadhguruMarathi

Download Sadhguru App 📲 http://onelink.to/sadhguru__app

Yogi, mystic and visionary, Sadhguru is a spiritual master with a difference. An arresting blend of profundity and pragmatism, his life and work serves as a reminder that yoga is a contemporary science, vitally relevant to our times.

Subscribe to Sadhguru Marathi YouTube Channel Here: https://www.youtube.com/sadhgurumarat...

Official Sadhguru Website
http://isha.sadhguru.org

Official Social Profiles of Sadhguru Marathi
  / sadhgurumarathi  

show more

Share/Embed