अदभुत शक्तीस्थान आणि रहस्यमय ठिकाण श्री क्षेत्र कानिफनाथ गड, बोपगाव पुणे
Mi Vatsaru  मी वाटसरू Mi Vatsaru मी वाटसरू
20.7K subscribers
3,651 views
88

 Published On Dec 29, 2023

असे श्रद्धा ज्याचे ऊरि… त्यासी दिसे हा कानिफा मुरारी
श्री क्षेत्र कानिफनाथ हा गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे. तेथे कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे मंदिर आहे. मंदिर प्राचिनकालीन ( सुमारे ८०० वर्षापूर्वीचे ) आहे. ते या पंचक्रोशितील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.
पुण्यावरून दिवे घात मार्गे सासवड हे शहर सुमारे २८ km वर आहे व हडपसर पासून सुमारे १७ km. सासवड शहरा पासून पाशिमेकडे कोंढव्या कडे जाताना ९ km वर बोपगाव या गावानजीक कानिफनाथ मंदिराकडे जायला एक फाटा आहे. ४-५ km चा प्रवास व एक छोटा घाट चढून गेल्यास कानिफनाथ मंदिरा पर्यंत पोहचता येते. पुण्यावरून बापदेव घाट मार्गे सासवड ला जाताना सुद्धा आपण कानिफनाथ मंदिराकडे जाऊ शकतो.वरती गेल्यावर दोन मंदिरे दिसतात. एक उंचावर आहे ते कानिफनाथाचे. मंदिरासाठी काही पायर्‍या चढून वर यावे लागते. मंदिर म्हणजे एक छोटी गुहा आहे, त्यात सरपटत आत शिरावे लागते. मंदिरातील गाभारा मोठा आहे. तिथला पुजारी आत शिरण्याची युक्ती सांगतो. आत शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. आतमध्ये शिरल्यावर अंधाराला डोळे सरावतात आणि थोड्याच वेळात समाधी नीट दिसू लागते. मशिदीसारखे त्यावर एक कापड पसरलेले दिसले. बाहेर येताना जसे आत शिरलो तसेच बाहेर पडता येते.
#saswad
#madhi
#templesnearpunecity
#historicalplacesinpune
#heritageofpune
#religiousplacesnearpune
#hindutemples
#viralvideo
#trendingvideos
#favouriteplaceinpune
श्री नऊनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी #हिमालयातील एका #हत्तीच्या_कानामध्ये_जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले.
कानिफनाथांनी प्रर्दीर्घ काळ #नाथसंप्रदायाचे काम केले. धर्माचे #संस्कृतीचे रक्षण केले. #नाथ_पंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी #नगर_जिल्हातील #मढी या गावी फाल्गुन वद्य(रंगपंचंमी)च्या दिवशी #संजीवनी_समाधी घेतली.
अदभुत शक्तीस्थान आणि रहस्यमय ठिकाण श्री क्षेत्र कानिफनाथ गड, बोपगाव पुणे‪@Mivatsaru‬

show more

Share/Embed