Aaichya Hatcha - Mom's Recipes | ft.
Bharatiya Touring Party Bharatiya Touring Party
301K subscribers
284,620 views
9.1K

 Published On Premiered Jun 4, 2021

From creating content that everyone loves to creating a mark in the digital world, his talent has no bounds! But what does his mother think about his crazy personality? Let's find out! Join in as we bring you a fresh episode of #AaichyaHatcha featuring your favourite Neel Salekar, his lovely mother and some tempting dishes. Do watch till the end and for more such content subscribe to #Bha2Pa.

Visit https://bhadipa.com/ for more videos and events!
Follow us on :
  / bhadipa  
  / bhadipa  
  / bha2pa  

For more comedy & entertainment, subscribe to Bharatiya Digital Party!
   / bharatiyadigitalparty  

सुकं चिकन -

साहित्य:
सुकं खोबरं
ओलं खोबरं
बेडगी मिरची
कांदा
लसूण
कोथिंबीर
आलं
तेल
दही
लिंबू
तमाल पत्र
दालचिनी
हळद
मीठ
लवंग
लाल तिखट
पाणी ( कोमट)
चिकन मसाला

कृती:
चिकनला लिंबू आणि दही लावून किमान अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करावे. तोवर सुकं चिकन करण्यासाठी साहित्य भाजून मसाल्यासाठी वाटण तयार करावे.

वाटण १: तव्यावर सुकं खोबरं, कांदा आणि गरम मसाले चांगले भाजून त्याचे वाटण करून घ्यावे.
वाटण २: दुसऱ्या भांड्यात बेडगी मिरची व ओलं खोबरं तांबूस भाजून सुके करावे व उभा चिरलेला कांदा थोड्या तेलात तांबूस भाजून साहित्याचे वाटण करावे.
वाटण ३: आलं, लसूण आणि कोथिंबीर तेलावर थोडी भाजून त्याचेहि मिक्सर मध्ये वाटण करावे.
वाटण ४ : चिरलेला कांदा तेलात भाजून कुरकुरीत करावा व थंड झाला की त्याचे वाटण करून घ्यावे.

पातेल्यात तेल गरम करून तमाल पत्र व दालचिनी घालून त्यात कुरकुरीत केलेलं कांद्याचं वाटप, आले लसूण व कोथिंबीर याचे वाटप टाकावे. मग तिखट मसाला, चिकन मसाला, गरम मसाले आणि सुके खोबरे व ओले खोबरे याचे तयार केलेले वाटण टाकावे. वाटण चांगले तेल सुटे पर्यंत परतावे आणि शेवटी चिकन घालून सर्व साहित्य नीट परतून घ्यावे. चांगले परतल्यावर मीठ घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. चिकन शिजत आल्यावर थोडे गरम पाणी ओतून पुन्हा एकदा हलवून झाकण लावावे. चिकन पूर्ण शिजल्यावर गॅस बंद करावा व चिकनला काजूच्या कापांनी सजवावे.

खापरोळी-

साहित्य :
तांदूळ
उडीद डाळ
पोहे
पाणी
मेथीचे दाणे
ओल्या नारळाचे दूध
गूळ
चवीनुसार मीठ

तांदूळ, पोहे, उडीद डाळ आणि मेथीचे दाणे पाच तास भिजल्यानंतर मिक्सर मध्ये वाटावे. बारीक केलेले पीठ रात्रभर आंबवण्यासाठी ठेवावे. वाटलेल्या पिठात चवीनुसार मीठ घालावे व तव्यावर थोडे जाड गोल पसरावावे. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे सर्व्हिंग प्लेट मध्ये घेऊन त्यात गुळ घातलेले नारळाचे दूध घालावे. वरून बदाम, पिस्ता आणि केसर ने सजवावे.

Credit List:
Featuring -
Neel Salekar
Nikita Salekar

Directed by Indrajeet More
Cinematography - Aditya Divekar
Editor - Anuja Bhandare
Production - Prajakta Salbarde
Creative Producer - Anusha Nandakumar
Social Media Team - Aniket Jadhav, Pooja Parab, Tanvi Kulkarni
Graphics - Prajakta Newalkar, Gaurav Khairnar
Subtitles - Prachi Hankare

show more

Share/Embed