वसंत उर्जाच का ? कस अन कधी वापरायच ? सर्व पिकाविषयी सविस्तर माहिती.SSK|ISF|VSI|BARC|ShriNiwas Nikam
Indian Samarth Farmer Indian Samarth Farmer
25.9K subscribers
129,912 views
2.7K

 Published On Nov 13, 2021

नाविन्यपूर्ण जैवसंजीवक संकल्पनेवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे आणि भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी संशोधन करून 'वसंत उर्जा' हे जैवसंजीवक शाश्वत शेतीकरिता एक बहुउपयोगी निविष्ठा निर्माण केली आहे. हे सर्व पिकांच्या अजैविक ताण म्हणजे पाण्याची कमतरता, तीव्र तापमान, अति थंडी अथवा रोग व किडी इ. नियंत्रणाकरिता अतिशय उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
प्रथम आपण 'जैव संजीवक’ ही संकल्पना थोडक्यात समजून घेऊ. जैव संजीवक हे विशिष्ट प्रकारच्या वनस्पती तथा प्राणीजन्य अथवा सेंद्रीय-असेंद्रीय घटक किंवा वेगवेगळी जीवाणू खते, जैविक कीड/रोग नियंत्रण करणारे सूक्ष्म जीवाणू इ. घटक होत. उदा. ह्युमिक अॅसिड, फॉलिक अॅसिड, समुद्री शेवाळ अर्क, जीबरेलिक अॅसिड, सॅलिसिलीक अॅसिड इ.
यांच्या संपर्कात वनस्पती पेशी आल्या असता त्या पेशींचे उद्दीपन होऊन पेशींमध्ये विविध संवेदना जागृतीचे काम करतात. ज्यामुळे वनस्पती पेशीअंतर्गत उपयोगी जैवरासायनिक अभिक्रियांचा वेग वाढून जैविक (रोग व किडी) आणि अजैविक ताण (पाण्याचा तुटवडा, प्रखर सूर्यप्रकाश, अति शीत वा तीव्र तापमान, जमिनीची क्षारता) यांमुळे होणारे नुकसान टाळले जाते.
वसंत ऊर्जा या जैव संजीवकाच्या प्रायोगिक चाचण्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, भाभा अणुसंशोधन केंद्र, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांच्यामार्फत घेऊन त्याचे निष्कर्ष महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन समितीपुढे मांडण्यात येऊन त्याची शिफारस करण्यात आली आहे.
पॅकिंग :- 1 लिटर व 5 लिटर मध्ये

.

🎋 Indian Samarth Farmar 🎋 आपल्या YOU TUBE Channel ला Subscribe करा.

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना जैविक व रासायनिक शेतीविषयी मोफत मार्गदर्शन मिळेल.
कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी एक वेळ आवश्य फोन करा.
शक्य आसल्यास कोणत्याही एका शाखेला भेट द्या.
कृषी क्षेत्रातील महत्वाची महिती,आधुिनक तंत्रज्ञान, शासनाच्या विविध योजना, शेतकऱ्याच्या बांधावरील वेगवेगळे प्रयोग, प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा नवनवीन यंत्राची माहिती इ. नक्की पहा.

☎️:- 7219164566

show more

Share/Embed