Mangla Theater Pune: मध्यरात्री भररस्त्यात टोळीकडून तरुणाचा खून पुण्यात पुन्हा Koyta gang active ?
BolBhidu BolBhidu
2.17M subscribers
702,696 views
7.9K

 Published On Aug 17, 2023

#BolBhidu #ManglaTheater #PuneCrime

मागच्या काही महिन्यांपासून पुण्यातल्या गुन्हेगारीनं पुन्हा डोकं वर काढलंय. वेगवेगळ्या बातम्या समोर येतायत आणि चर्चेत राहतोय तो कोयता पॅटर्न. सदाशिव पेठेत एका तरुणीवर भर दिवसा झालेला हल्ला, त्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात दहशत पसरवण्यासाठी कोयत्याचा वापर झाल्याच्या बातम्या आल्या. सध्या चर्चेत आलीये, गॅंगवॉरमध्ये कोयता वापरुन करण्यात आलेली एका गुन्हेगाराची हत्या.

१५ ऑगस्टच्या मध्यरात्री मंगला थिएटरच्या बाहेर एका तरुणाची १० ते १२ जणांच्या टोळीकडून हत्या करण्यात आली. पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा न्यायालय आणि मेट्रो स्टेशन या गोष्टी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी ऐन मध्यरात्री घडलेल्या या प्रकरणामुळे पुण्याला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. पण हत्या करण्यात आलेला नितीन म्हस्के कोण होता ? या प्रकरणात संशय घेण्यात येणारी यल्ल्या टोळी कोण आहे ? आणि हे प्रकरण नेमकं काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed