|श्री_रेणुकामाता_सोमठाणा_गड| | Somthana_Gad |ता_बदनापूर_जि_जालना
 Shaurya Tracking Shaurya Tracking
533 subscribers
289 views
30

 Published On Oct 10, 2024

#रेणुका देवी हे भारतातील प्रमुख ५१ शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे. या देवीला 'एकवीरा', 'यमाई', 'येल्लुआई' तसेच 'येल्लम्मा' अशा विविध नावाने विविध प्रांतात संबोधले जाते. ही देवी आदिशक्तीचे प्रकट रूप महाकाली म्हणून पूजली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू व काश्मीर ह्या राज्यात रेणुका देवीचे उपासक प्रामुख्याने आढळतात. महाराष्ट्रात माहूरगडाव्यतिरिक्त दैत्यसंहारासाठी व भक्तकल्याणासाठी रेणुकामाता यमाई, एकविरा, मोहटादेवी, पद्माक्षी रेणुका अशा नानाविविध अवतारांत प्रकट झाली. रेणुका देवीला "साऱ्या जगाची आई" अर्थात "जगदंबा" मानतात. रेणुका माता ही क्षत्रियकुलवंत, ब्राह्मण, आदिवासी व पतीतांची माता व रक्षक म्हणून सर्वांकडून पूजली जाते. त्याचबरोबर कोळी, आगरी लोकांची आई म्हणून'तिचे एकवीरा हे रूप प्रसिद्ध आहे.

शक्तीपीठाचे हे श्री रेणुका माता सोमठाणा_गड हे उपपीठ म्हणून प्रसिद्ध आहे... हे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा ह्या गावात आहे...
या गडावर श्री शिवमंदिर आहे,पाण्याचे कुंड आहे, दीप माळ, श्री_रेणुका माता यांचे भव्य मंदिर आहे.

show more

Share/Embed