सौरपंपामुळे शेतकऱ्यांना मिळणार 25 वर्षे मोफत वीज, आता मागेल त्या शेतकऱ्याला मिळणार सौरपंप
S PRIME NEWS S PRIME NEWS
562K subscribers
2,462 views
19

 Published On Sep 14, 2024

S PRIME NEWS
सौरपंपामुळे शेतकऱ्यांना मिळणार 25 वर्षे मोफत वीज, आता मागेल त्या शेतकऱ्याला मिळणार सौरपंप

पूर्वी कृषीपंपाच वीज कनेक्शन घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक महिने वाट पहावयास लागायची... मात्र आता राज्यातील महायुती सरकारने मागेल त्याला सौरकृषी पंप ही योजना सुरू केलीय.. त्यामुळे आता सौरपंपाची मागणी केल्यानंतर अगदी काहीच दिवसांमध्ये शेतकऱ्यांना सौरकृषी पंप मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय... तसेच या सौरपंपामुळे शेतकऱ्यांना 25 वर्षे वीज बिलच येणार नाहीये... त्यामुळे एका शेतकऱ्यांची तब्बल 10 लाख रुपये एवढी बचत होणार आहे.. तसेच शेतकऱ्यांनी हा सौरपंप लावल्यानंतर त्यामधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ही ग्रीडमध्ये पाठवून ती वीज कंपन्यांना विकण्यात येणारय... त्यामुळे शेतकऱ्यांना या सौरपंपामधून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त विजेपासून उत्पन्न मिळणारय.. मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये करण्यात आलं... देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांनी सुरू झालेल्या या मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमुळे मात्र शेतकऱ्यांना सौरपंपाच वीज बिल येणार नाहीये... आणि सौरपंपामधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढण्यास मदत होणार आहे... पाहुयात याबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस...

show more

Share/Embed