आईपण देगा देवा... गणेशोत्सव २४, घरगुती गणेश सजावट.
Tejas Lokhande Tejas Lokhande
644 subscribers
1,115 views
71

 Published On Sep 10, 2024

गणेशोत्सव २०२४

आईपण देगा देवा...

जन्म घेऊनी तू, केलेस मला आई...
कसं पांग फेडू तुझे, माझी ग तू रखमाई...
पाहता तुझे रूप, होई दूर सगळी व्यथा..
विश्र्वरूप ब्रह्मांडाची, आनंद देणारी माझी कथा..

हीच असते ना कथा...
प्रत्येक आईची, प्रत्येक माऊलीची...
हीच माऊली त्या बाळाची पहिली गुरू असते, वात्सल्याचा निर्झर झरा बनते, हीच मायेचं पांघरूण होते तर कधी खंबीर आधार देते. एक अलौकिक शक्तीचा उगम ही आईच, त्याचं सर्वस्व ही आईच. जन्मानंतर एक स्त्री बाळ ही कोणाची मुलगी, बहीण, मैत्रीण, अर्धांगिनी, वहिनी, आत्या, मावशी, नणंद, जाऊ अशा अनेक नात्यांमध्ये स्वतःला गुंफून घेते, पण तिची माळ पूर्ण होते ती तिच्या स्वतःच्या निर्माण केलेल्या आई या दागिण्याने आणि म्हणूनच "आईपण देगा देवा" असे म्हणतात, मानतात. थोडक्यात आई म्हणजे एका शब्दाचं महाकाव्य म्हटले तर वावगे ठरणार नाही.

सृष्टीतल्या त्या पार्वती, रखमाई पासून ते आताच्या सगळ्या जन्मदात्री, पालनकर्ता आईंना मनाचा मुजरा. हा बाप्पा त्याच्या सगळ्या आयांना सुखी ठेवीत, आनंद - समाधान - निरोगी दीर्घायुष्य देवो, हेच मागणं.

संकल्पना - डॉ. तेजस लोखंडे
मूर्तिकार - संजय गावडे
विशेष मार्गदर्शन - डॉ. सुमित पाटील
व्हिडिओ आणि एडिटिंग - डॉ. तेजस लोखंडे
लिखाण आणि मनोगत - केयुरी बामणे, अक्षता लोखंडे, डॉ. शाम नाबर आणि डॉ. तेजस लोखंडे
सजावट व प्रकाश योजना - प्रणव बामणे
गीत सौजन्य - आनंदघन, आनंदी गोपाळ

show more

Share/Embed