कोकणातील सूर्य मंदिर कशेळी | कनकादित्य मंदिर रत्नागिरी | देवघळी कशेळी बीच | रत्नागिरी व्लॉग-7
Kiran Vlog Creators Kiran Vlog Creators
334 subscribers
74 views
11

 Published On Apr 25, 2024

कोकणातील सूर्य मंदिर कशेळी | कनकादित्य मंदिर रत्नागिरी | देवघळी कशेळी बीच | रत्नागिरी ट्रॅव्हल व्लॉग-7

कनकादित्य मंदिर-
मंदिर साधारण ९०० वर्षे प्राचीन आहे. पूर्णतः अस्सल कोकणी कौलारू स्थापत्य शैली येथे पहायला मिळते.
मंदिराचे अंतरंग खूपच सुंदर असून लाकडी खांबावर नक्षी व वेलबुट्टी केलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर आणि छतावर विविध देव-देवता लाकडावर कोरलेल्या आढळतात. यामध्ये प्रामुख्याने कार्तिक, वरुण, श्रीकृष्ण, वायू, अग्निनारायण, शेषशायी विष्णू तसेच समुद्रमंथन आणि दशावतार या पौराणिक कथा प्रसंग चित्रीत केले आहे.

देवघळी कशेळी बीच (किनारा)-
ज्या समुद्री गुहेत श्री. कनकादित्यची मूर्ती सापडली त्या गुहेस व किनाऱ्यास "देवघळी बीच" म्हणतात. येथून समुद्राचे अत्यंत मनोहर असे दृश्य दिसते. हे नैसर्गिक बीच असून कड्यापासून समुद्राकडे जाण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन व महाराष्ट्र मेरीटाइन बोर्डाने चिरेबंदी वाट बांधली आहे. तसेच येथे सुंदर पर्यटन स्थळ निर्माण केले आहे. सायंकाळी येथे सूर्यास्ताचे सुंदर व डोळ्यात साठवण्यासारखे मनमोहक दृश्य अनुभवण्यासारखे आहे.

show more

Share/Embed