राहुरी/मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा कणगर येथिल मातंग समाजावर शसस्ञ हल्ला करणाऱ्याना अटक करा.
SRB NEWS LIVE SRB NEWS LIVE
16.9K subscribers
1,821 views
28

 Published On Sep 30, 2024

लहुजी शक्ती सेनेचे ज्ञानेश्वर जगधने यांच्या नेतृत्वाखाली
राहुरी तहसीलवर मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा

कणगर येथिल मातंग समाजावर शसस्ञ हल्ला करणाऱ्याना अटक करा.

मुख्यमञ्यांच्या बंगल्यावर महाराष्ट्रातील मातंग समाजाचा बिऱ्हाड मोर्चा

#srb_news_live #मातंग_आक्रोश_मोर्चा

मातंग समाजावर होणारे अन्याय, अत्याचारा विरोधात तसेच विविध मागण्यां सदर्भात आज दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी लहुजी शक्ती सेनेचे ज्ञानेश्वर जगधने यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने राहुरी येथील तहसील कार्यालयावर भव्य मातंग आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर जगधने यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राहुरी तालुक्यातील कणगर येथे लाहूंडे नामक मातंग समाजाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सदर घटनेला सुमारे वीस दिवस झालेत, मात्र या घटनेतील मुख्य आरोपीला अद्याप अटक केली नाही. सदर आरोपीला तीन दिवसात अटक न झाल्यास मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर महाराष्ट्रातील समस्त मातंग समाजाच्या वतीने बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येईल. असा यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला. राहुरी तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात मातंग समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहे. या होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात तसेच विविध मागण्यां संदर्भात लहुजी क्रांती सेनेच्या वतीने आज हा भव्य मातंग आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चाला राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळा येथून सुरुवात होऊन नगर मनमाड रोड, जिजाऊ चौक, नवीपेठ, शनी चौक, स्टेशन रोड या मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. त्या ठिकाणी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करुन संताप व्यक्त करुन पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. राहुरीचे तहसिलदार नामदेव पाटील रजेवर असल्याने नायब तहसिलदार यांनी निवेदन स्वीकारण्याची तयारी दाखविली होती.परंतू मोर्चेकरी आक्रमक झाले होते.जो पर्यंत तहसिलदार पाटील निवेदन स्वीकारण्यास येत नाही.तो पर्यंत तहसिल कार्यासमोर आक्रोश आंदोलन सुरुच राहिल असे जाहिर करताच रजेवर असणारे तहसिलदार पाटील यांनी तहसिल कार्यालयात येवून मोर्चाकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
या प्रसंगी सदर मोर्चा लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णु कसबे व प्रभारी प्रदेशाध्यक्ष कैलास खंडारे, जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने, जिल्हाध्यक्ष नंदुभाऊ शिंदे, माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने, बाबा साठे, बाबासाहेब शेलार आदिंसह लहुजी शक्ती सेनेचे व मातंग समाज या मोर्चात मोठ्या संख्येने सामील झाले होते.


SRB News साठी राजेंद्र उंडे राहुरी

show more

Share/Embed