उपवास स्पेशल: आल्याची चटणी, बटाटे-रताळ्याचे कालवण | Fasting Recipes । Quick & Easy Upwas Vrat Recipe
Anuradha Tambolkar Anuradha Tambolkar
494K subscribers
6,054 views
249

 Published On Premiered Oct 2, 2024

#upwas #upwaschatni #upwasthecha #Upvasachathecha #Thecharecipe #kalvan #कालवण #upwasAlooCurry #Upvasrecipe #Fastingrecipe #chaturmas #NoOnionNoGarlic #चातुर्मास #उपवासचटणी #उपवासाचाठेचा #navratrispecial #नवरात्रीस्पेशल

तुम्हाला उपवासाचे तेच-ते पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे ना? म्हणून उपवासाला फराळ करताना तोंडी लावायला शेजारी काहीतरी चमचमीत - झणझणीत हवं आहे, हो ना? ही डावी बाजूच आपल्या फराळात विविधता आणत असते म्हणून सगळ्यांना ती जास्तच आवडत असते.. मग त्या साठी एक नव्हे तर दोन पदार्थ आपण पाहुयात.

१. आल्याची चटणी / ठेचा :
१० ते १२ लाल सुकवलेल्या मिरच्या उकडून मऊ झाल्या की त्याची देठं काढून जाडसर वाटून घ्यावे. २ इंच आलं कीसून घ्यावे. तेलात जिरे घालून ते तडतडले की त्यात आल्याचा कीस घालावा. आले चांगले परतले गेले की त्यात १ चमचा ओले / सुके खोबरे घालावे व छान परतून घ्यावे. त्यात जाडसर वाटलेल्या मिरच्या घालून त्यात चवीपुरते मीठ घालावे. आता अर्धवट कुटलेले दाणे व जिरे घालून सर्व मिश्रण परतून घ्यावे. झाला आपला मस्त झणझणीत ठेचा / चटणी तय्यार!

२. रताळं - बटाटा कालवण :
तेलात जिरे घालून ते तडतडले की त्यात बारीक बटाट्याचे आणि रताळ्याचे काप केलेले घालावे व छान परतून घ्यावे. दुसरीकडे ४ चमचे दाण्याचे कूट, १ ते १.५ चमचा खोबरं, १ हिरवी मिरची, १ चमचा जिरे व १ चमचा कोथिंबीर एकत्र जाडसर वाटून घेणे. आता हे वरील वाटण आपल्या रताळ्या - बटाट्याच्या भाजी मध्ये घालावे. रताळ्याचा आणि बटाट्याचा रंग बदलला की त्यात थोडे पाणी व चवी पुरते मीठ घालून झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवून घ्यावे. झालं आपलं कालवण तय्यार!

कशा वाटल्या तुम्हाला ह्या झणझणीत रेसिपीज?
उपवास आणि चातुर्मास स्पेशल तर आहेच होना, पण जेवणात तोंडाला चव येण्यासाठी पण तुम्ही ह्या रेसिपिज करू शकता. हे जरा हटके पदार्थ नक्की करून बघा आणि आम्हाला ते कसे झाले नक्की सांगा? आणि हो अनुराधा रेसिपीज चॅनलला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!!

#upwas #fastingspecial #chaturmasspecial #maharashtrianthecha #navratrispecial
How to Make Upvasacha Thecha
How to make Ginger Thecha
How to make Special Upvasacha Thecha
How to make Upvasacha Kalvan
How to make Sweet potato Recipes
No onion no garlic food recipe, pure vegetarian food recipes, Anuradhas Recipes, Recipes by Anuradha

---------------------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

Subscribe to Anuradha's Channel -    / @anuradhaschannel  
Instagram Channel-   / anuradhaschannel  
Facebook Channel -   / anuradha.tambolkar  

show more

Share/Embed