अवघ्या १० मिनिटांत तयार करा झणझणीत ओल्या बोंबलाचे खेंगाट | Bombil Khengat Recipe | Bombay Duck Curry
Gharcha Swaad Gharcha Swaad
1.27M subscribers
266,616 views
3.2K

 Published On Nov 11, 2018

How To Make Bombil Curry | Bombil Recipe | Olya Bombilche Kalvan | Quick Bombil Curry

Homemade Red Masala | घरगुती आगरी कोळी मसाला 👉   • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...  

साहित्य 👉 ५०० ग्रॅम ओले बोंबील, १½ tbl spn घरगुती लाल मसाला, ½ tea spn हळद, १ tbl spn आले लसूण क्रश केलेले, ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ३ tbl spn तेल, ३ tbl spn बारीक चिरलेली कोथिंबीर, ५/६ कोकम पाकळ्या, १½ ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ.

कृती 👉 प्रथम बोंबीलचे मध्यम आकारात तुकडे करून त्यांना स्वच्छ करून घ्यावे. एका खोलगट भांड्यात स्वच्छ केलेले बोंबील आणि घरगुती लाल मसाला, हळद, आले लसूण क्रश केलेले, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर, कोकम पाकळ्या, पाणी आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य एकत्र घालावे आणि चांगले एकजीव करावे. आता गॅसची आच मोठी ठेवून या खेंगाटला १० मिनिटे उकळून घ्यावे. १० मिनिटांनंतर गॅस बंद करून मस्त गरमागरम बोंबील खेंगाट सर्व्ह करावे.

टीप 👉 जर बोंबील मोठ्या आकारात असतील तर १२ ते १५ मिनिटे उकळी काढावी पण, त्यापेक्षा जास्त उकळी काढू नये. बोंबील जास्त उकळून घेतल्यावर बोंबील खळून म्हणजेच तुकडे तुकडे होऊन जातात. बोंबील बुळबुळीत असल्यामुळे त्यांना शिजायला फारसा वेळ लागत नाही.

#bombilcurry #fishcurryrecipe #bombayduckrecipe

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Follow Us On Facebook 👉   / gharcha.swaad  

For Business Enquiries 👉 [email protected]

show more

Share/Embed