सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी (अब्दुल नदाफ), अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ
Prasad Temkar Prasad Temkar
11.9K subscribers
50,517 views
474

 Published On Dec 30, 2020

सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी
वाट तुझी पाहीन त्या,
वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी

हिरवळीत गीत गात, सांजरंगि न्हात न्हात
हिरवळीत गीत गात, सांजरंगि न्हात न्हात
स्वप्‍नांना रंगवुया,
स्वप्‍नांना रंगवुया लेवुनिया लाली
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी

अधरी जे अडत असे, सांगीन तुज गुज असे
अधरी जे अडत असे, सांगीन तुज गुज असे
प्रीती ही प्रीतीविण,
प्रीती ही प्रीतीविण, अजुनही अबोली
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी

तृणपुष्पे मोहक ती,उमलतील एकांती
तृणपुष्पे मोहक ती,उमलतील एकांती
चांदण्यात उमलवुया,
चांदण्यात उमलवुया, प्रीत भावभोळी
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी
वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी

show more

Share/Embed