OMKAR SWARUPA MARATHI GANPATI BHAKTI GEET KARAOKE Edited by SUNIL MANJREKAR GEET MALLHAR KARAOKE S
Sunil Manjrekar Sunil Manjrekar
58K subscribers
271,030 views
2.1K

 Published On Sep 13, 2018

माणसाचा जन्म मिळणे हे आपले भाग्य आहे पण त्याहून एक चांगला कलाकार घडून जगणे हे आपले सौभाग्य आहे, 'कलाकार घडावा आणि घडवावा अभियान.'
या पूर्वी सर्वत्र हिन्दी तसेच इंग्लिश कराओके उपलब्ध होत होते पण मराठी का नाही? जर तुमच्या सर्वांचा पाठिंबा असेल तर, चांगला कलाकार घडावा आणि घडवावा या दृष्टीकोणातून, मी मराठी कराओके जास्तीत जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करीत आहे, तरी आपल्या सर्वांचे सहकार्य मला असावे, जास्तीत जास्त कलाकारांनी subscribe करून मला पाठींबा ध्यावा ही विनंती,
मी बनविलेल्या विडियो कराओके मधील काही विडियो व इमेजेस, यूट्यूब व गूगल वर काही वाहिन्यांनी व कॅसेटस कंपन्यांनी अपलोड केलेले घेतले आहेत, सर्वांचे आभार, यूट्यूब व गूगलचा वापर करून मी बरेच काही शिकलो, तुम्ही ही शिका आणि याचा चांगला वापर करा, चांगले कलाकर घडा आणि आपले तसेच आपल्या आई वडीलांचे व देशाचे नाव रोशन करा,
माझ्या या अभियानाला यशस्वी करण्यामागे आपल्या सर्वांचे तसेच ऑडिओ विडियो प्रसारित वाहिन्या, प्रोड्यूसर कॅसेटस कंपनी आणि म्युझिक वादक, यूट्यूब व गूगल सर्वांचेच योगदान बहुमूल्य आहे,
मी एक लहान कलाकार आहे, कॉम्प्युटर इंजीनियर आहे ते कोणाकडे शिकलो नाही, गाणे तसेच एडिटिंग देखील कोठे शिकलो नाही, माझा स्वतःचा कोणताही स्टुडिओ नाही, मी एका लहानशा घरात रहातो जागा अपुरी असल्याने घरात छोटासा पोटमाळा बनविलेला आहे त्या पोटमाळ्यावर मी ताटपणे बसूही शकत नाही अशा परिस्तितीत आपल्यासाठी मी रात्री 3:00am -3:30am वाजेपर्यंत कराओके घडविण्याचे काम करीत असतो, ज्या वेळेस आपली अर्धी झोप झालेली असते, म्हणूनच माझे एकच ध्येय कलाकार घडा आणि घडवा.
धन्यवाद,
विशेष आभार:-:- लहानपणीच वडील वारल्याने परिस्थिति बिकट होती शाळेत मिळणार्‍या पावावर दिवस काढावा लागायचा केंव्हा तो ही मिळत नसे अशा परिस्तितीत माझ्या चुलत वहिनीने मला तिच्या घरी नेले, मला लहाणाचे मोठे केले, शिक्षण दिले आणि तिच्यामुळेच मी घडलो अशा माझ्या वहिणीसाठी मी ईश्वरा जवळ एकच मागणे मागतो की माझ्या वाट्याचे सर्व सुख माझ्या वहिनीला लाभो आणि तिचे दुख: माझ्या वाट्याला येओ.

show more

Share/Embed