Vijaydurg Fort | PART 2 | Underwater Wall | विजयदुर्ग किल्ला । पाण्याखालील तटबंदी । RoadWheel Rane
RoadWheel Rane RoadWheel Rane
111K subscribers
1,111,363 views
18K

 Published On Mar 26, 2021

किल्ले विजयदुर्ग भाग १ :    • Vijaydurg Fort | Part 1 | धुळपांच्या ...  

किल्ले विजयदुर्ग भाग २ :    • Vijaydurg Fort | PART 2 | Underwater ...  

किल्ले विजयदुर्ग भाग ३ :    • Vijaydurg Fort | PART 3 | काय घडतंय क...  
-------------
इन्स्टाग्राम आयडी : (roadwheelrane)
https://instagram.com/roadwheelrane?i...
------------
विजयदुर्ग किल्ल्याबद्दल विस्तृत माहिती देणारे अनेक व्हिडीओ युट्यूबवर अस्तित्वात आहेत. मात्र मागील १० वर्षात #vijaydurg किल्ल्याची खरी संपत्ती असलेल्या पाण्याखालील तटबंदीचा मागोवा घेण्याचा फारसा प्रयत्न झालेला दिसत नाही. युट्यूब चॅनेल सुरू करतानाच काहीतरी वेगळं दाखवायचं ठरल्याने या तटबंदीचं दर्शन रसिक प्रेक्षकांना घडवण्याचं निश्चित केलं. आवश्यक धाडस करण्याची मानसिक तयारीही केली. पहिल्या भागात मारुती मंदिर, जिबीचा दरवाजा, महादरवाजा, पाणी वाहून नेण्याची व्यवस्था, खलबतखाना, घोड्याची पागा आणि महिला सुरक्षेसाठी महत्त्वाची भुमिका बजावण्यार्या भुयारी मार्गाचं दर्शन घेतलं. या भागात दारूचे कोठार, खुबलढा तोफामारा बुरूज, सुस्थितीत असलेले दोन भुयारी मार्ग, सायबाचे ओटे, पाण्याचा हौद, पाण्याखालील तटबंदी आणि इतर काही गोष्टी पाहणार आहोत. #travel #gadkille #chhatrapatishivajimaharaj
-----------
मुंबईत तळ ठोकलेल्या इंग्रजांना कोकणातील विजयदुर्गचा करारीपणा अनेक वर्षांपासून खुपत होता. त्यामुळे हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी गोर्यांच्या तीन मजबूत युद्धनौका विजयदुर्गच्या दिशेनं रवाना झाल्या. मात्र त्यांची ही मोहीम फ्लॉप गेली. कारण विजयदुर्गपासून काही अंतरावर या युद्धनौका बुडाल्या. हे का घडलं याचा शोध घेतला असता, समुद्राच्या ओहोटीच्या वेळीही पाण्याखालीच राहील अशी जाडजूड भिंत समुद्राखाली बांधलेली आढळली.
प्रकाशचित्र तज्ज्ञांनी या संदर्भात अभ्यास केला असता हे बांधकाम १७ व्या शतकात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. #shivajimaharaj यांनी विजयदुर्ग किल्ल्यावर तिहेरी तटबंदीचं कडं घालताना, पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली. याच अदृश्य तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकल्या आणि त्या बुडाल्या असा निष्कर्ष काढण्यात आला. #underwater #rampart

महाराजांची गलबतं सुद्धा याच समुद्रात फिरत होती. मग ती का बुडाली नाहीत? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मात्र राजांच्या गलबतांचा अभ्यास केलात तर ती एकतृतियांश पाण्याखाली असत. या तुलनेत शत्रूंच्या युद्धनौका दोन तृतियांश पाण्याखाली असत. याचमुळे राजांची गलबतं अगदी सहजपणे ही भिंत पार करत.

हे सर्व दृश्य स्वरूपात तुम्हाला उत्तम पद्धतीने कळावं यासाठी RoadWheel Rane आणि टीमनं पुरेपूर प्रयत्न केले आहेत. एडिटींग किती कठीण असते याची जाण असलेल्या प्रेक्षकांना हे लगेच लक्षात येईल.
--------------
झिरो व्हिजीबिलीटी म्हणजेच पाणी अत्यंत गढूळ असल्यामुळे भिंत टप्प्यात असूनही आम्हाला अपेक्षित चित्रिकरण करता आलं नाही.. मात्र असाच प्रयत्न २०१० साली झी मराठीवरील मिलिंद गुणाजी यांच्या 'डिस्कोवर महाराष्ट्र' या भटकंती कार्यक्रमांसाठी सारंग कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने केला होता. सर्व तयारीनिशी गेल्यानंतरही त्यांना अपेक्षित फुटेज न मिळाल्याचे दिसून येते. या तुलनेत आम्ही अत्यंत अपुरे मनुष्यबळ, सामग्रीच्या साहाय्याने हा प्रयत्न केला. भिंतीजवळ पोहोचलोही. मात्र ते फुटेज मिळवू शकलो नाही. 'त्यामुळे झीवरील संबंधित फुटेज आम्ही वापरत आहोत.' तसेच प्राध्यापक निनाद बेडेकर यांनी दिलेल्या मुलाखतीतील काही अंश आम्ही व्हिडिओकरिता वापरले आहेत. तसेच भिंत असली तरी ती जहाजं नेमकी कशी फुटायची हे नेमकं लक्षात यावं यासाठी शक्य तितके R&D करून फुटेज मर्ज करून सादर करण्यात आलं आहे. यामागे रसिक प्रेक्षकांना अधिकाधिक माहिती मिळावी हेच अंतिम ध्येय आहे.
--------------
हा प्रयत्न करताना विजयदुर्ग ग्रामस्थांची खूप मदत झाली. आमचे मित्र संदीप सारंग यांनी देखील मोलाची साथ दिली.
-------------
GoPro Hero 8 Black : https://amzn.to/3ehYZzl
Secondory DSLR Camera (Canon EOS 1500D) : https://amzn.to/3tytJ5Q
Primary DSLR Camera : (Canon EOS 200D II) https://amzn.to/3n0jh4s
-------------
Thumbnail : MAULI DIGITAL (Ruchil Sawant)
-------------
Credit
Music: Valiant - AShamaluevMusic
Epic Inspirational and Cinematic Motivational Background Music by AShamaluevMusic
bensound.com
Mixkit.com

Sound Effects:
zapsplat.com

show more

Share/Embed