Ranbhaji recipe/वाघाट्याची भाजी/Waghatyachi bhaji/आषाढस्पेशल वाघाट्याची भाजी/पोस्टीक औषधीगुणाची भाजी
Rupali's Food Culture Rupali's Food Culture
37.5K subscribers
16,616 views
162

 Published On Aug 25, 2021

Ranbhaji recipe/वाघाट्याची भाजी/Waghatyachi bhaji/आषाढस्पेशल वाघाट्याची भाजी/पोस्टीक औषधीगुणाची भाजी

वाघाटे हा एक रानमेवा असून या वाघट्याला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे आषाढी एकादशीला याचा विशेष मान असतो. वाघट्याच्या फळाला देवाला अर्पण केले जाते तसेच आषाढी एकादशीचा उपवास या वाघाटे च्या भाजीवर सोडला जातो. वाघाटे हे आषाढ महिन्यातच माळरानावर, जंगलामध्ये उपलब्ध होतात. हे वाघाटे आषाढ महिन्यात बाजारामध्ये सुद्धा विक्रीस असतात. अतिशय टणक पेरूच्या सारखे असं हे फळ असते थोडीशी उग्र व मेंनचट अशी यांची चव असते परंतु त्यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे ही भाजी खाणे शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे .वाघात्याच्या फळापासून व त्याच्या पानापासून सुद्धा भाजी बनवली जाते विशेष करून वाघाटे च्या मुळाचा अनेक औषधी मध्ये पावडरच्या स्वरूपात उपयोग केला जातो, अनेक आजारांवर ही औषधे वापरली जाते ,त्यामुळे वाघाटे च्या फळांना ,भाजीला विशेष महत्त्व आहे. त्याचे औषधी गुणधर्म व त्याचे अनेक फायदे पाहता वाघाटे च् आपल्या शरीरात सेवन करणे अत्यंत उपयुक्त आहे परंतु त्याच्या उग्र चवीमुळे हे फळ तशी खाता येत नाही म्हणून त्याची एक विशिष्ट प्रकारे भाजी करून त्याचा उग्र वास न येता भाजी टेस्टी कशा प्रकारे केली जाते याचा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर केलेला आहे.
तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि वाघाटे च्या फळांची भाजी आषाढ महिन्या मध्ये करून खा, आपल्या शरीराला स्फूर्ती, चैतन्य आणि रोग प्रतिकार शक्ती भरभरून मिळेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि माझ्या चानलला सबस्क्राईब नक्की करा .धन्यवाद🙏
साहित्य :-
वाघाटे फळे 100 ते 200 ग्रॅम
मीठ, तिखट ,हळद चवीनुसार
कांदा एक बारीक चिरून
भिजलेली मूग डाळ एक छोटी वाटी
जिरे एक चम्मच
तेल पाच ते सहा टेबल स्पून
कोथिंबीर मुठभर
मोहरी एक छोटा चमचा.

#Rupalisfoodculture

show more

Share/Embed