लोहगड | Lohgad Fort
सह्याद्रीसुख सह्याद्रीसुख
603 subscribers
723 views
48

 Published On Jun 7, 2024

#fort #shivajimaharaj #sahyadri #maharashtra #pune #marathi #trek #oneday #near #mahadev #marathi #sahyadri #sahyadrisukh #लोहगड #vlog #travel #killa #fort #trek #trekking #near #pune #mumbai #mulshi #lonavala #expressway #vlog #hindi #hindu #lohgad #lohgadfort #time #for #oneday #trekking #trek #visit #maharashtra #trip #maharashtra #history #story #fort #near #pune

लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ. स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे

लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. २००० वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.

इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होय. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.

इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.

पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा : "शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली." नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्‍नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हूकुम सोडला. तेथून अनिच्छेनेच मराठे मागे फिरले.

कसे जावे?
स्वारगेट -- कोथरूड -- चांदणी चौक --पौड --हाडशी -तिकोनापेठ --लोह गड (180-200किमी )

खर्च?
400-500 रुपये पेट्रोल
100-150 रुपये नाश्ता -जेवण

वेळ?
जाणे -येणे -किल्ला चढणे व थांबणे 7-8 तास

Music:Views
Musician:Ikson
License:https://ikson.com/track/89/views


आम्ही केलेली अजून काही गडांची ट्रेकिंग आणि संपूर्ण माहिती :

सिंधुदुर्ग -महाराजांना भारतीय नौदालाचा जनक म्हणून ओळख देणारा :

   • सिंधुदुर्ग | Sindhudurg Fort #shivaji...  

पूर्णगड -कान्होजी अंग्रेच्या नौदालासाठी महत्त्वचा दुर्ग :

   • आधुनिक भारतीय नौदल म्हणून कान्होजी आं...  

अजिंक्यतारा -स्वराज्याची चौथी राजधानी :

   • अजिंक्यतारा | Ajinkyatara Fort-स्वराज...  

पांडवगड -कुणीही न दाखवलेला (101%):

   • पांडवगड | Pandavgad Fort- कुणीही न दा...  

सज्जनगड-कुणीही न पाहिलेला:

   • सज्जनगड | Sajjangad Fort- न पाहिलेला ...  

मल्हारगड -किल्ल्यावर आढळणाऱ्या वेगवेगळ्या वास्तू माहिती सोबत :

   • मल्हारगड | Malhargad Fort-मराठ्यांनी ...  

तिकोना - पुण्याजवळ सहज एका दिवसात पोचून आनंद देऊन जाणारा :

   • पवनमावळाचा पहारेकरी किल्ले तिकोना | T...  

रायरेश्वर -हिंदवी स्वराज्याची शप्पथ जिथे घेतल्याचा आभासी अनुभव देऊन जाणारा :

   • रायरेश्वर पठार | Rayreshwar Fort-शपथ ...  

केंजळगड- गांधी टोपीच्या आकाराचा छोटासा एका दिवसात होण्यासारखा सोप्प्या चढाईचा गड :

   • केंजळगड | Kenjalgad Fort- टेहळणी किल्...  

राजगड -स्वराज्याची पहिली राजधानी, स्वराज्याच वैभव दाखवणारा उन्हाळ्यात अनुभवलेला एक सुखद अनुभव :

   • स्वराज्यांची पहिली राजधानी - राजगड | ...  

रोहिडा - भोर जवळ वसलेला एक दुर्लक्षित वैभवसंपन्न, सोप्प्या चढाईचा अतिशय सुंदर गड :

   • किल्ले रोहिडा | Rohida Fort #shivajim...  

तोरणा - स्वराज्याच तोरण बांधून देणारा, उन्हाळ्यात आपला राकटपणा दाखवणारा वेल्हे तालुक्यातला प्रचंडगड :

   • तोरणा | Torna Fort- स्वराज्याचे पहिले...  

show more

Share/Embed