Badalapur Encounter: एन्काऊंटरनंतर `देवाचा न्याय’ आणि `एक नाथ,एक न्याय’ची स्पर्धा काय सांगते?
Prashant Kadam Prashant Kadam
218K subscribers
39,693 views
1.7K

 Published On Sep 25, 2024

बदलापूरमधील ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजपच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यामुळे या शाळेचं नावही गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेच्या प्रशासनावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे विशेष. ही शाळा नेमकी कुणाची आणि कोण चालवतंय याचीही माहिती समोर येऊ दिली नाही. त्यामुळे शाळेबद्दल असलेली माहिती दडपण्याचा प्रयत्न केला गेला का असा प्रश्न उपस्थित होतोय.

ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेच्या संस्थाचालकाला पोलिस वाचवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यानंतर आता संस्थाचालक फरार असून त्याचा पोलिसांना अद्याप त्याचा कोणताही पत्ता लागला नाही. त्यामुळे अद्याप त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही.

एकंदरीत, मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करून या अत्याचार प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुषमा अंधारे आणि इतर विरोधी पक्षांनी केला.

#badalapur #encounter #maharashtrapolitics #akshayshinde #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #mahayuti #prashantkadam #prashantkadam #prshantkadamchannel

show more

Share/Embed