उन्हाळयात कोकणात काय अनुभवाल? EP 1 | जांभळाचे गाव आणि कर्ली नदी
Konkani Ranmanus Konkani Ranmanus
480K subscribers
131,979 views
3.3K

 Published On Apr 6, 2023

तळ कोकणातील सावंतवाडी आकेरी हुमरस आणि माणगाव खोऱ्यातील गावांना जांभळाच्या नैसर्गीक जंगलांची देणगी लाभली आहे...
ईथे कलमी जांभळे कोणी लावत नाही.....इथे जांभळाचे वृक्ष आहेत... वसंता नंतर म्हणजे सुरंगी नंतर जांभळाचा हंगाम सुरू होतो... काळी टपोरी अवीट गोड चवीची मोठ्या आकारा च्या रानटी जांभळानी लगडलेली झाडे बघून कोकण ची समृद्धी मनाला अनोखे समाधान देते..

आपल्याकडे काय नाही?

ह्या एका हंगामात काजू आंबे फणस जांभूळ जाम चाफ्रा कोकम करवंद चारोळी अश्या असंख्य प्रकाराच्या रान फळा च्या स्वाद सुगंधनाचा जणू सोहळाच भरला आहे...

सगळ्या गावात जवळपास सगळीच फळे आढळत असली तरी काही गावांना भौगोलिक परिस्थिती प्रमाणे विशिष्ट प्रकारच्या झाडांची नैसर्गीक देणगी लाभली आहे...

तेरेखोल खोऱ्यातील फणस..माणगाव खोऱ्यात जांभळे...देवगड चा हापूस...दोडामार्ग चा काजू... वेंगुर्ला चा मानकुर आंबा...शिरोडा आसोली ची सुरंगी ...

आम्ही आकेरि हुमरस भागातील जांभळाची काढणी पाहिली आणि झाडाखालीच जांभळाचा आस्वाद घेतला...

इथले काही स्थानिक लोक जांभळाचा व्यापार करत आहेत..ज्यामुळे ह्या फळांना शहरात आर्थिक किंमत मिळाली आहे....ज्या लोकांनी ही झाडे जपली आहेत त्यांना चार पैसे मिळाले तर संवर्धन अजून जोमाने होईल....आणि ह्या परिसरातील जंगले जांभळानी अशीच समृद्ध राहतील...

जांभूळ खरेदी साठी संपर्क

96072 63918 Gundu Sawant



Explore Heavenly Konkan with Ranmanus

show more

Share/Embed