GURUDEV DATTA MORALE.....250
GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANNEL GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANNEL
121K subscribers
38,389 views
1.2K

 Published On Premiered Apr 20, 2022

आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री बंडु दादा ( संतोष पाटील ) यांचे गाणगापुर येथील प्रति वर्ष केले जाणारे संगम ते समाधी मठ यामधील दंडवत चे काही भाग ज्याची सुरुवात साक्षात काकांनी केली आहे ( श्री भालचंद्र पाटील )
संगम ते समाधी मठाचे अंतर हे जवळ पास साडेतीन किलोमीटर असताना विचार करा साडेतीन किलोमीटर दंडवत पहाटे 3:00 वाजता सुरु केले तरी संपायला 10:30 ते 11:00 वाजतात. आपल्याला व्हिडीओ बघताना किती वेळ लागतोय तर प्रत्यक्ष काय होत असेल.....
महत्वाची गोष्ट म्हंजे साक्षात श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज ज्या मार्गाने नित्य संगम ते मठ गमन करत असत त्याच मार्गाने हे दंडवत पुर्ण केले जाते आनी त्याला साथ असतें आमच्या मोराळेतील नित्य सेवेकरी मंडळीच्या अखंड नामस्मरनाची.....
अहो त्या मार्गांवरून जर फक्त तुम्ही चालत जरी गेलात तरी पुण्य कर्म मोजले जाते आनी ही मंडळी तर नामस्मरण करत जातात मग काय बोलायलाच नको......
आनी सगळ्यात महत्वाची जबाबदारी जर कोन यावेळी पार पाडत असेल तर ते म्हंजे आमचे बबलु भैया ( राकेश गोरे - सांगली - 8888339005 ) यांना साक्षात दत्त प्रभुचं वरदान आहे की काय असं वाटत,...
कारण ज्यावेळी यांचं संबळ वाजायला सुरुवात होते त्यावेळी रस्त्याने येना जाणाऱ्या शक्त्या सुद्धा जागृत होतात, आनी ते देखील अखंड कुठेही न थांबता सेवेकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक सारखे संबळ तर वाजवतातच आनी नामस्मरण देखील करतात.....
अश्या या चमत्कारीक क्षनांचे साक्षी आम्हाला महाराजांनी केलं त्याबद्दल आम्ही जन्मो जन्मी महाराजांचे ऋणी राहू.
म्हणूनच म्हणतात नां....
कोटी ब्रम्हहत्या हरिती करिता दंडवत,
कोटी ब्रम्हहत्या हरिती करिता दंडवत.
लोटांगण घालता मोक्ष लोळे पायात,
लोटांगण घालता मोक्ष लोळे पायात.
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरु रायांची,
झाली त्वरा सुरुवरा विमान उतरायाची.....

show more

Share/Embed