जेव्हा गौरी आका घरी येते | कोकणातील गौरी आवाहन | कोकण/माझा गाव | S For Satish
S FOR SATISH S FOR SATISH
383K subscribers
86,577 views
1.2K

 Published On Sep 13, 2019

दरवर्षी गौरी गणपतीच्या सणात एक असाही दिवस असतो ज्या दिवशी गौरीचे आवाहन म्हणजेच आगमन असते. या दिवसाला खूप महत्व आहे. कोकणामध्ये गावातील महिला गावाच्या वेशीवर जिथे दरवर्षी गौरी सजवून आणल्या जातात तिथे जमतात. असा म्हटलं जातं की, गौरी या दिवशी माहेरी येतात. चिरड्याच्या वनस्पतीमध्ये साडी नेसून गौरींना गावात आणण्यात येते.
यावर्षी गौरी गणपतीच्या सणात कोकणात मुसळधार पाऊस होता तरीसुद्धा बऱ्याच महिला आपापल्या गौरींना आणण्यासाठी आल्या होत्या. आमच्याकडे गौरीला 'आका' म्हणतात वडलांची बहीण म्हणजेच आत्या च्या रूपात गौरीचे आगमन घरी होत असते. त्या दिवशी घरी गौरीसाठी खास दारच्या भाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य असतो. दुसऱ्या दिवशी सुवासिनी आणि कुवारवासिनीचे वौसे पुजले जातात. एकंदर या दिवसात घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि भक्तिमय होऊन गेलेलं असतं.
मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोकणामध्ये गौरींचे आवाहन कसे होते ते पाहता येईल.

#gauriakajevhaghariyete #gauriavahan2019 #kokanmazagaon #sforsatish

व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक करा.
चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला जरूर Subscribe करा!

Follow me on Facebook
  / sforsatish  

Follow me on Instagram
  / s__for_satish  

चला तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र !! 😊

show more

Share/Embed