Galna Fort | Malegaon | गाळणा किल्ला | ६ राजवटी ह्या किल्ल्याने अनुभवलेले आहेत | Lalitchavanvlog
Lalit Chavan Lalit Chavan
2.14K subscribers
18,974 views
331

 Published On Mar 12, 2020

नमस्कार मित्रांनो,
तुमचं Lalitchavanvlogs चॅनेल मध्ये स्वागत आहे.
★ गाळणा किल्ल्यावर जाण्यासाठी मालेगाव आणि धुळे या दोंन्ही बाजूंनी रस्ते आहेत. आपल्याला मालेगाव - डोंगराळे मार्गे गाळणा गावात पोहचता येते. मालेगावाहून डोंगराळे पर्यंत येण्यास एसटी बसेस आहेत. मालेगाव - डोंगराळे अंतर साधारणत: ३० किमी आहे. धुळ्याहूनही डोंगराळ्याला बसेस आहेत. हे अंतर साधारणपणे ३५ कि.मी आहे. डोंगराळेहून ४ किमी अंतरावर असलेल्या गाळणा गावात पोहचता येते. गाळणा हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.

★ किल्ल्याचा इतिहास:- इतिहासकारांच्या मते बागलाणचे राठोडवंशीय बागुल यांनी १३ व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली असावी. बहामनी व निजामशाही यांनादेखील बागलाणवर वर्चस्व मिळविणे जमले नाही. पंधराव्या शतकाच्या शेवटी या किल्ल्यास महत्व प्राप्त होउ लागले. सन १४८७ मध्ये दौलताबादच्या मलिक वूजी आणि अश्रफ या बंधुनी गाळणा किल्ला मराठ्यांकडून जिंकला. पुढे निजामाशी दोन हात करण्यांत मलिक वूजीचा खुन झाला. किल्ला निजामांनी स्थानिक मराठा सरदारांकडे दिला व त्या बदल्यांत निजाम खंडणी घेऊ लागला. बहामनी सत्तेच्या अस्तानंतर गाळणा किल्ला निजामशाहीचा एक भाग म्हणुन ओळखला जाऊ लागला. इ.स.१५१० ते १५२६ दरम्यान गाळणा किल्ला निजामशाहाने जिंकला पण बागलाणचा राजा बहिर्जी याने इ.स.१५२६ मध्ये हा गड परत घेतला. इ.स.१५५५ मध्ये हुसैन निजामशहा याने हल्ला करून हा गड आपल्या ताब्यात घेतला. १५६० साली मात्र खंडणी बंद होऊन गाळणा स्वतंत्र झाला. सन १६६४ मध्यें गाळणाचा मुसुलमान किल्लेदार महमदखान ह्याचा शहाजीस हा किल्ला देण्याचा विचार होता पण शहाजहानकडून मोठे इनाम मिळाल्यामुळें त्यानें तो बादशहास दिला. सन १६७९ मध्यें शिवाजीराजांनी हा किल्ला घेतला. १७०४ मध्ये स्वत: औरंगझेबाने गाळण्याला वेढा घातला तरी हा किल्ला जिंकण्यास त्याला वर्ष लागले. इ.स.१७५२ मध्ये मल्हारराव होळकर व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला. १८०४ साली हा किल्ला इंग्रज कर्नल वॅलस याने होळकरांकडुन जिंकुन घेतला. त्यानंतर किल्ले गाळणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. १८१८ नंतर काही वर्षे ह्या गांवी मामलेदार कचेरी होती. इंग्रजांनी खानदेश घेतल्यावर कांही दिवस गाळणा हें खानदेशांतील एक उत्तम हवेंचे ठिकाण म्हणून उपयोगांत येत होते.

------------------------------------------

आपल्या फेसबुक पेजला लाईक करा:
  / lalit.chavan.9619  
आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा:
  / lalitchavanvlogs  

------------------------------------------

show more

Share/Embed