kunjargad| कुंजरगड|कोंबडकिल्ला|इतिहास|रहस्यमय गुहा|भुयार|फोफसंडी
आडवाटा..एक रमणीय प्रवास आडवाटा..एक रमणीय प्रवास
6.3K subscribers
414 views
55

 Published On Aug 9, 2024

kunjargad| कुंजरगड|कोंबडकिल्ला|इतिहास|रहस्यमय गुहा|भुयार|फोफसंडी#kombadkilla#phopsandi#history#fort

निसर्ग सौंदर्याने नटलेला आपला महाराष्ट्र... आणि याच महाराष्ट्राची खरी ओळख म्हणजे महाराजांचे गडकोट... असंख्य गडकोटांनी सजलेला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागातील फोफसंडी या गावाच्या वायव्यस वसलेला असाच एक अपरिचित दुर्ग म्हणजे  कुंजीरगड, कुंजरगड, किंव्हा ऊकोंबड किल्ला... आणि याच किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्ही निघालो ते फोफसंडी या गावाच्या दिशेने.... फोफसंडी हे अहमदनगर जिल्ह्यातील शेवटचे टोक... पाहताच प्रेमात पडावं असं हे गाव.... निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेले हे गाव... चारही बाजूने उंच उंच डोंगररांगा आणि याच डोंगर रांगेच्या अंग खांद्यावर खळाळत ,फेसाळत वाहणारे असंख्य धबधबे.... धबधब्यांचा गाव म्हणून या गावाची विशेष ओळख.. येथील उंच उंच डोंगररांगेमुळे सूर्यप्रकाश पोहोचायला एक तास उशीर लागतो   तेच सायंकाळी सूर्यदेव एक तास अगोदरच निरोप घेतात... या गावचा नावाचा इतिहास काही असा रंजक आहे... स्वातंत्र्यपूर्व काळात पॉप नावाचा एक ब्रिटिश अधिकारी येथील निसर्गाच्या प्रेमात पडल्यामुळे दर रविवारी म्हणजे संडे ला या गावाला भेट देत असे.. त्यामूळे पॉप संडे ला येत असल्यामुळें पॉपसंडे या नावाचा अपभ्रंश होऊन फोपसंडी हे नावं पडलं. आजही या अधिकाराचे रेस्ट हाऊसचे अवशेष आपल्याला पहावयास मिळते...अतिदुर्गम गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात सर्व आदिवासी मंडळी भात शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गावात शाळा व अनेक मंदिरे देखील आहे. कुंजीरगडावर येण्यासाठी दोन मार्ग आपल्याला लागतात त्यातील पहिला मार्ग म्हणजे कोतुळ मार्गे विहीर या गावाकडून आपल्याला या किल्ल्यावर येता येते व दुसरा मार्ग म्हणजे फोफसंडी या गावातून येतो ... फोफसंडी पासून साधारणता दोन तास किल्ले चढाईला लागतात... वाटेत आपल्याला छोटी मोठी कुडाणे रचलेले टुमदार घरे नजरेस पडतात.. सततच्या पावसामुळे घराच्या भिंती व भुईला सतत ओल असते... तरीदेखील येथील स्थानिक लोक याच घरांमध्ये वास्तव्य करतात काहींच्या घरातच आपल्या गाईगुरे आणि शेळ्यांसाठी निवारा देखील केलेला आहे आपल्याला पाहायला मिळतो.. येथील काही स्थानिक लोक चक्क 400 वर्षापासून गुहेतच राहणं पसंत करतात... कुठल्याही प्रकारे विजेची सोय नाही की मोबाईल ला रेंज नाही की धान्य दळण्यासाठी गिरणी नाही.. वर्षानुवर्ष ते याच राहतात .. साधारणतः एक तास चालल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या मोडकळीस आलेल्या पायऱ्या व आत्ताच नव्याने केलेलं लोखंडी रेलिंग दिसायला लागतं व त्याच्याच उजव्या बाजूला एक प्रचंड मोठी नैसर्गिक गुहा देखील पाहायला मिळते.. गुहेपासून थोडा वर आल्यास मारुती रायाची एक मूर्ती आपल्या नजरेस पडते व थोडेच पुढे आल्यानंतर एक पाण्याचे टाक व नव्याने ठेवण्यात आलेले नंदी व शिवलिंग नजरेस पडतात थोडं पुढे गड माथ्यावर आल्यावर एक भग्न अवस्थेत पडलेली  मूर्ती आपल्याला पाहायला मिळते... गड माथ्यावर काही वाड्याचे जोती देखील आहेत.. थोडं अजून पुढे चालत गेल्यास एक स्वच्छ पाण्याचे टाकून आपल्याला दिसतं हे टाका वरून आपल्याला उतरता येईल एवढीच जागा दिसते परंतु खाली गेल्यावर त्याची भव्यता आपल्या लक्षात येते... त्यातलं पाणी पिण्यास योग्य आहे... पुढे का टाक्यात नाग शिल्प आणि एक मूर्ती कोरलेली आपल्याला दिसते... गडावर अजून चार-पाच पाण्याची टाकी व शेवटी तटबंदीचे काही अवशेष आपल्याला दिसतात... कुंज या शब्दाचा अर्थ हत्ती असा होतो... आणि लांबून या किल्ल्याकडे बघितल्यावर हत्तीच्या आकाराचा हा किल्ला भासतो म्हणून याला कुंजरगड असे नाव पडले स्थानिक लोक याला कोंबडकिल्ला म्हणून देखील ओळखतातकुंजरगडाचा उल्लेख इतिहासात मुख्यत्वे केला जातो.  कुंजरगड हा मजबूत आणि पाठीराखा किल्ला.. ई स.१६७० मध्ये महाराज सुरतेची दुसऱ्यांदा लुट करून महाराष्ट्रात नाशिक अहमदनगर आणि मग पुणे रायगड असा प्रवास करणार होते. कांचनबारी येथे मुघलांशी महाराजांचे युद्ध झाले आणि याचे नेतृत्व महाराजांनी करत मोकळ्या मैदानात महाराजांनी मोगलांचा पराभव केला. आता युद्धामुळे फौजेला विश्रांतीची आणि जखमींना सुश्रुषेची गरज होती. त्यामुळे महाराजांनी कुंजरगडावर हि सर्व व्यवस्था केली. येथेच प्रतापराव, आनंदराव व व्यंकोजीपंत यांच्यासह महाराज पुढचे बेत ठरवत होते. याच गडावर महाराज विश्रांती घेत असताना मोरोपंतानी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला असला तरी त्यांनी त्र्यंबकगडावर भगवे निशाण रोवले हा आनंद वेगळाच होता. कुंजरगडावरच मुक्काम करून राजे काही दिवसाने येथूनच ताज्या दमाने कारंज्याच्या मोहिमेवर निघाले.... गड उतार करत असताना रेलिंग च्या उजव्या बाजूचा रस्ता आपल्याला एका रहस्यमय भुयारा कडे घेऊन जातो.... सुरुवातीला मानवनिर्मित असणारे हे भुयार जसजसे पुढे जाऊ तसतसे निमुळते होत जाताना दिसते... ह्या नैसर्गिक विहरातून आपल्याला डोंगर पार करून पलीकडे जाता येते परंतु यासाठी आपली मानसिक तयारी त्याचबरोबर वजन देखील कमी असायला लागतात.. 40 ते 50 फूट लांबीच्या  या भुयारातून आपल्याला झोपून आणि रांगत जावे लागत... एका मध्यवर्ती ठिकाणी एक नागमोडी वळण आपल्याला पार करावे लागते इथेच खरा कस लागतो आत मध्ये संपूर्ण अंधार अंधार असतो समोरचं काहीच दिसत नाही एकदा का ते पार केलं की आपण कडेला जाऊन पोहोचतो व तेथून दिसणारा दृश्य अप्रतिम आहे आणि या भुयारातून पलीकडे जाण्याचा प्रवास म्हणजे एक थ्रील अनुभव आहे... भुयार पाहून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाने निघालो आज भटकंतीला सोबती जाधव सर काव्या आणि मानसी होते आणि सोबत स्थानिक गाईड गणेश देखील होता... संपूर्ण पावसात आणि प्रचंड वाऱ्याच्या प्रवाहात किल्ला पाहणे म्हणजे एक पर्वणीच.#शिवाजीमहाराज#shivajimaharaj#fort#fodsandi#village#akole#watwefall#rain#rice#

show more

Share/Embed