शिवाजी कोण होता?| गोविंद पानसरे| पुस्तक वाचावं का? | वाद काय आहे? Shivaji Kon Hota?| Govind Pansare
Ram Kadam Ram Kadam
19.3K subscribers
13,872 views
542

 Published On Premiered Feb 20, 2022

‪@ramkadam4498‬

शिवाजी कोण होता ?

गोविंद पानसरेंनी सांगितलेला शिवाजी !


"माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा गुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे. समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो.."

यादृष्टीने कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहलेले ‘ शिवाजी कोण होता?’ , हे छोटेसे पुस्तिकावजा पुस्तक महत्वाचे आहे. ‘शिवाजी कोण होता?’ असा शिवाजीचा एकेरी उल्लेख पानसरे करतात तेव्हा ते शिवाजीचा अनादर करत नाहीत, तर शिवाजीला माणसाच्या पातळीवर आणून त्याच्याभोवती असलेले देवत्व आणि अवताराचे अनाठायी वलय सहजी भेदतात. असा शिवाजी आपला असतो, अगदी जवळचा असतो.
( डॉ. प्रदीप आवटे यांच्या लेखातील अंश. )

'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शिर्षकावरून होत असलेला वाद हा अनाठायी आहे. हे पुस्तक प्रत्येक शिवप्रेमीनं का वाचलं पाहिजे, याविषयी विवेचन करणारा व्हिडिओ आज गोविंद पानसरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त तयार केलाय ! पाहिल्यावर प्रतिक्रिया नक्की द्या!
राम कदम.

show more

Share/Embed