वाघबीळ उर्फ नाचणटेपाची गुहा - रायगड किल्ल्याच्या आसमंतातातील एक अपरिचित स्थळ (GUNS OF PACHAD)
Marathi Buzz Marathi Buzz
1.35K subscribers
1,394 views
17

 Published On Nov 5, 2022

किल्ले रायगडाच्या आसमंतात अनेक स्थळे आहेत जी आजही फारशी प्रसिद्धीच्या झोतात आलेली नाहीत व यापैकी एक म्हणजे वाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा. ही गुहा पाचाडहून रायगडच्या दिशेने येताना चीत दरवाज्याच्या विरुद्ध दिशेस असलेल्या एका डोंगरात समुद्रसपाटीपासून अदमासे साडे चारशे मीटर उंचावर आहे. ही गुहा नैसर्गिक असून तिचा काळ अश्मयुगापर्यंत जातो. अश्मयुगात मानवाने याठिकाणी निवास केल्याचे पुरावे संशोधकांना आढळले आहेत. या गुहेस वाघबीळ, नाचणटेपाची गुहा अथवा गन्स ऑफ पाचाड या नावाने ओळखले जाते व हिचा वापर मानवी अधिवास, वन्य प्राण्यांचा अधिवास तसेच पहाऱ्याची चौकी म्हणून केला गेला होता. या गुहेचे वैशिट्य म्हणजे हिला एकूण तीन तोंडे असून यातील दोन तोंडे पश्चिम दिशेस असून तिसरे व मोठे तोंड पूर्वेस आहे व येथूनच सध्या गुहेत प्रवेश करण्याचा मार्ग आहे. गुहेचा आतील भाग प्रशस्त असून हवा व प्रकाश येण्यास विपुल जागा आहे व एका वेळी या ठिकाणी पंचवीस माणसे राहू शकतात. ऐतिहासिक काळात येथून पश्चिमेकडील पाचाड व पूर्वेकडील रायगडवाडी या रायगडाकडे येणाऱ्या दोन प्रमुख मार्गांवर नजर ठेवणे शक्य होते आणि वेळप्रसंगी या ठिकाणी तोफा सुद्धा ठेवल्या गेल्याचे उल्लेख आढळतात. रायगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर घालणारी ही गुहा एकदा तरी पाहायलाच हवी.

show more

Share/Embed